घरदेश-विदेश'राम मंदिर नाही तर वोट नाही' प्रविण तोगडिया यांचा इशारा

‘राम मंदिर नाही तर वोट नाही’ प्रविण तोगडिया यांचा इशारा

Subscribe

'राम मंदिर नाही तर वोट नाही' याच घोषणेने यापुढील आंदोलनाची सुरुवात करणार असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रमुख प्रवीण तोगडिया यांनी दिला आहे.

‘राम मंदिर नाही तर वोट नाही’ असा इशारा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रमुख प्रवीण तोगडिया यांनी दिला आहे. ‘राम मंदिर नाही तर वोट नाही’ याच घोषणेने यापुढील आंदोलनाची सुरुवात करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. आयोध्या जिल्हा प्रशासनाने शरयू तीरावर सभा घेण्यास परवानगी नाकारल्यानंतरही प्रविण तोगडिया आज सभेसाठी पोहचले. या सभेमध्ये त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, गेल्या ३२ वर्षापासून आरएसएस, भाजप आणि विश्व हिंदू परिषद एकाच मुद्द्याला घेऊन राम मंदिराचे आंदोलन करत आहेत. आता केंद्रात भाजपचे बहुमताचे सरकार असूनही ते राम मंदिराच्या दर्शनासाठीही येत नसल्याची टीकाही तोगडिया यांनी केली.

५०० कोटीचे भाजप कार्यालय बांधले

या सभेदरम्यान, तोगडिया यांनी भाजपवर टीका करताना असे म्हटले आहे की, दिल्लीमध्ये ५०० कोटी खर्च करुन भाजपने कार्यालय बनवले. मात्र रामलला आजही मंदिराच्या प्रतिक्षेत आहे. तोगडिया यांनी उत्तरप्रदेश सरकारवर देखील आरोप केले आहेत. आयोध्येत येण्यापासून आम्हाला रोखण्यात आले. आमच्या सभेली परवानगी नाकारण्यात आली. आमच्या समर्थकांचे खाद्यपदार्थाने भरलेले ट्रक अडवले गेले. अशी परिस्थिती मुलायमराज म्हणजे मुलायमसिंह सरकारच्या काळात होती. ती पुन्हा आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

- Advertisement -

लखनऊमध्ये बाबरी मशीद बांधणार

तोगडियां यांनी केंद्र सरकारवर देखील आरोप केले आहेत. सरकार लखनऊमध्ये बाबरी मशीद बांधणार आहे. त्यामुळे भाजपचे राम मंदिराचा वाद देखील जुलमा असल्याचा आरोप केला आहे. केंद्र सरकार लखनौमध्ये बाबरी मशीद बांधणार आहे. मग आयोध्येत राममंदिर कधी बांधणार असा सवाल त्यांनी केला आहे.

भाजपच काँग्रेसयुक्त झाले

काँग्रेसमुक्त भारताचा नारा देता देता भाजपच काँग्रेस युक्त झाल्याचा टोला तोगडिया यांनी भाजपला दिला आहे. काँग्रेसचा कचरा, ज्याला काँग्रेसमध्ये कोण विचारत नाही त्यांना भाजपमध्ये आणून मोठ्या पदावर बसवले आहे. सच्चे भाजप कार्यकर्ते राम मंदिराचे स्वप्न बघत आज देखील रडत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -