घरदेश-विदेशराष्ट्रपती रामनाथ कोविंद मुंबईच्या किनार्‍यावरील झाडांना पाहून झाले प्रभावित, राष्ट्रपती भवनाने मागवली...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुंबईच्या किनार्‍यावरील झाडांना पाहून झाले प्रभावित, राष्ट्रपती भवनाने मागवली माहिती

Subscribe

राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुंबईच्या किनारपट्टीवरील झाडांनी चांगलेच प्रभावित झाले आहेत. त्यांना मुंबईत नव्याने होत असलेल्या कोस्टल रोड परिसरातील समुद्रफळ (बॅरिंगटोनिया एशियाटिका) हे झाड फार आवडले आहे. यामुळे राष्ट्रपतींनी मुंबई दौऱ्यावर असताना मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून या समुद्रफळाची माहिती मागवली होती. यानंतर मुंबई पालिकेने नुकतीच राष्ट्रपती भवनाला या झाडाबद्दलची माहिती देणारे एक परिपत्रक पाठवले आहे.

मागील वर्षी डिसेंबरमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद चार दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी रायगडाला भेट दिली होती. राष्ट्रपतींनी रायगडाला दिलेली भेट ही त्यावेळी चांगलीच चर्चेत आली होती. या दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती राजभवनापासून ते विमानतळापर्यंत जात होते. याचवेळी बीएमसीच्या डी आणि जी-दक्षिण वॉर्डमधून जात असताना समुद्रफळ हे झालं राष्ट्रपतींच्या नरजेत भरले. हिरवंगार दिसणारं हे झाडं राष्ट्रपतींना चांगलेच आवडले होते. यानंतर राष्ट्रपतींनी या झाडाची संपूर्ण माहिती मुंबई महापालिकेच्या उद्याग विभागाला विचारली आहे. राष्ट्रपतींकडून एखाद्या झाडाची इतकी दखल घेत माहिती विचारल्याने मुंबई पालिकेनेही ती माहिती तात्काळ राष्ट्रपती भवनाला पाठवली आहे.

- Advertisement -

मुंबईच्या किनारपट्टी भागात समुद्रफळाची ३६३२ झाडं

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील समुद्र किनारपट्टी भागात समुद्रफळाची जवळपास ३६३२ झाडं लावण्यात आली आहे. हे झाडं खाऱ्या पाण्यातही तग ठरुन राहू शकते. ज्यामुळे समुद्र किनारपट्टी भागाची झीज रोखता येते. उष्णकटिबंधीय भाग, आफ्रिका, भारत, दक्षिणपूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिकपर्यंत पसरलेल्या प्रदेशात ही झाडं प्रामुख्याने आढळतात. हे झाडं साधारणं १० ते १५ मीटर उंच असते. कमी शाखांच्या संरचनेसह एक लहान खोडं विकसित करते. दाट फांद्या असलेल्या हे अत्यंत सुंदर दिसते. चकचकीत हिरवी पानं, गुलाबी रंगाच्या फुलांच्या माळा, मध्येच पांढर्‍या ट्यूलिप सारख्या फुलांच्या कळ्या अधिक आकर्षक वाटतात. हे फुलांना वर्षभर फुलांची बहर सुरु असते.


Thane Corona Update: सरत्या वर्षात ठाणेकरांचे टेन्शन वाढले, शुक्रवारी ९७२ रुग्णांची नोंद


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -