घरCORONA UPDATEThane Corona Update: सरत्या वर्षात ठाणेकरांचे टेन्शन वाढले, शुक्रवारी ९७२ रुग्णांची नोंद

Thane Corona Update: सरत्या वर्षात ठाणेकरांचे टेन्शन वाढले, शुक्रवारी ९७२ रुग्णांची नोंद

Subscribe

ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येते गेल्या चार दिवसांपासून झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी ठाणे जिल्ह्यात सुमारे एक हजार कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सरत्या वर्षांत जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले असून टेन्शन ठाणे,नवीमुंबई ,मीरा भाईंदर आणि कल्याण डोंबिवलीत आढळणाऱ्या रुग्णांमुळे निश्चित वाढले आहे.

ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी नोंदविण्यात आलेल्या ९७२ कोरोनामुळे एकूण रुग्णांची संख्या ही ५ लाख ७४ हजार ८५९ इतकी झाली आहे. वाढत्या रुग्णांमुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा हा २ हजार ४३० झाला आहे. चौघे दगवल्याने मृत्युमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या ११ हजार ६२० वर पोहोचली आहे. शुक्रवारी ठाणे महापालिका हद्दीत सर्वाधिक ३३६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ नवीमुंबईत २६५ रुग्ण नोंदवले गेले असून एकाचा मृत्यू झाला आहे. मीरा-भाईंदर १४२ रुग्ण आढळून आले आहेत. कल्याण डोंबिवलीत ११७ रुग्ण तर दोघांच्या दगाविल्याची नोंद करण्यात आली आहे. तर ठाणे ग्रामीण मध्ये ४२ रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच उल्हासनगर २७, अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर येथे प्रत्येकी १७ त्याचबरोबर सर्वात कमी ०६ रुग्ण हे भिवंडीत पुढे आले आहेत.

- Advertisement -

उपचारार्थ दाखल रुग्णांमध्ये नवीमुंबई आघाडीवर

वाढत्या रुग्ण संख्येत जिल्ह्यात उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांचा आकडा हा २ हजार ४३० वर पोहोचला आहे. यामध्ये नवीमुंबई ने आघाडी घेतली असून तेथे सर्वाधिक ९३६ रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ ठाणे ६१७, कल्याण-डोंबिवली ३५४, मीरा भाईंदर २५९, ठाणे ग्रामीण ११५,उल्हासनगर ६३, अंबरनाथ ३८, भिवंडी आणि कुळगाव बदलापूर येथे प्रत्येकी २४ रुग्ण उपचार घेत आहेत.


हेही वाचा – Mumbai corona virus Update: मुंबईत वर्षाच्या शेवटच्या दिवशी ५,६३१ नव्या रुग्णांची नोंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -