घरदेश-विदेशसर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ

Subscribe

देशात पेट्रोल- डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किंमतीमुळे सामान्य नागरिक आधीच मोटाकुटीला आलाय. त्याता आता गॅस सिलेंडरच्या किंमतीतही ५० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला अधिकची कात्री लागणार आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे १४ किलो वजनाच्या विना अनुदानित गॅल सिलेंडरसाठी ग्राहकांना ७६९ रुपये मोजावे लागणार आहे. ही दरवाढ आज (१५ फेब्रुवारी ) दुपारी १२ वाजल्यापासून देशात लागू होणार आहे. आतापर्यंत घरगुती गॅस सिलिंडर 694 रुपयांना मिळत होता.(Rise in the price of domestic gas cylinders)

देशात गॅस सिलेंडरच्या किंमतीत फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा भाव होत आहे. ४ फेब्रुवारीला विनाअनुदानित गॅस सिलेंडर हे २५ रुपयांचे महागल होते. त्यामुळे सामान्य नागरिकांना ६९४ रुपयांच्या सिलेंडरसाठी तब्बल ७१९ रुपये मोजावे लागत होते. २०२० चा विचार केला असता २ डिसेंबर २०२० मध्येही 50 रुपये आणि 15 डिसेंबरला 50 रुपयांनी प्रति सिलिंडरने वाढ केली होती. गॅस सिलेंडरच्या सतत वाढणाऱ्या किंमतीमुळे सामान्य गृहिणीचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहे.
गॅस सिलेंडरबरोबरचं पेट्रोल- डिझेलचे दरही सामान्यांच्या आवाक्याबाहेर होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेच्या दरात अनेकदा वाढ झाली आहे. पेट्रोलचा दर 28 पैशांनी वाढला तर डिझेलच्या दरात 34 पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीसह मुंबईत पेट्रोलचे दर 95.19 रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलचे दर 86.02 रुपयांवर पोहेचले आहेत.

- Advertisement -

केंद्र सरकारचे म्हणणे आहे की. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रुड ऑईल आणि प्राकृतिक गॅसच्या किंमतीत होणाऱ्या सततच्या भाव वाढीमुळे देशातही इंधन तेलाच्या किंमती वाढत आहे. तसेच पेट्रोल- डिझेलवर केंद्र सरकारकडून लावण्यात आलेल्या अधिकच्या करामुळे सामान्यांना त्याचा फटका बसत आहे.


हेही वाचा- उच्च शिक्षण मंत्र्यांनी चमकोगिरी सोडून शिक्षण व्यवस्थेच्या सुधारणेवर लक्ष द्यावे – अतुल भातखळकर

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -