घरदेश-विदेशकृषी विधेयकावर अखेर पंतप्रधान बोलले... दिलं महाराष्ट्राच उदाहरण

कृषी विधेयकावर अखेर पंतप्रधान बोलले… दिलं महाराष्ट्राच उदाहरण

Subscribe

शेतकरी आठवडी बाजारामुळे झाले आत्मनिर्भर

आपले कृषी क्षेत्र, शेतकरी आणि गावकरी हे आत्मनिर्भर भारताचा पाया आहेत. जर ते मजबुत असतील तर आत्मनिर्भर भारताचा पायाही तितकाच मजबुत असेल. नजीकच्या काळात आपण अनेक अडचणींचा सामना करत या पायाभरणीतील घटक अनेक आव्हानांना सामोरे गेले आहे. आतापर्यंतचे अनेक ट्रेंड त्यांनी बदलले आहेत हे ‘मन की बात’ मध्ये सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उदाहरण दिले.

- Advertisement -

तीन चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील फळ भाजीपाला उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रवाहाविरोधात जाऊन एक प्रयोग केला. कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला शेतमाल न विकता त्यांनी शेतकरी आठवडी बाजार भरवण्यासाठी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांनी थेट विक्री योजनेअंतर्गत आठवडी बाजार भरवायला सुरूवात केली. श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडची स्थापना करून पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील भिवरी गावाने एक देशासमोर शेतकरी आठवडे बाजाराच्या माध्यमातून समुह शेतीचे एक चांगले उदाहरण ठेवले असल्याचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मुंबई आणि पुण्यात येऊन हे शेतकरी स्वतः आठवडी बाजार भरवतात. जवळपास ४५०० इतक्या मोठ्या संख्येतील शेतकरी हे कोणत्याही अडत किंवा मध्यस्तीशिवाय थेट आपला शेतमाल आठवडी बाजारात विकतात. या सगळ्या शेतमाल विक्री प्रक्रियेत ग्रामीण भागातील तरूण वर्ग संपुर्ण व्यवसायाच्या निमित्ताने सहभागी झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाच याचा थेट फायदा होत आहे. जवळपास ७० गावातील शेतकरी या पुढाकारामुळे आणि त्यांच्याशी संबंधित तरूण रोजगार मिळवू लागले आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रासोबतच त्यांनी मणीपूरच्या विजय शांती यांचेही उदाहरण दिले. तिने लोटस स्टेम उत्पादनाचे स्टार्टअप सुरू केले. विजय शांतीच्या या पुढाकारामुळे कमळाच्या शेतीला आणि वस्त्रोद्योग क्षेत्राला नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत असेही त्यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात सांगितले. देशात कृषी विधेयकाविऱोधात विरोधकांनी रान उठवले आहे. अशावेळी पंतप्रधानांनी थेट शेतकऱ्यांच्याच पुढाकाराचे उदाहरण देत कृषी विधेयकाला एकप्रकारे पाठबळ दिले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -