घरदेश-विदेशपंतप्रधान मोदी चीन समोर झुकले आणि जमीनही दिली, राहुल गांधींचा घणाघात

पंतप्रधान मोदी चीन समोर झुकले आणि जमीनही दिली, राहुल गांधींचा घणाघात

Subscribe

गोगरा आणि हॉटस्प्रिंगच्या प्रश्नांवरही वक्तव्य नाही

भारतीय सैनिक फिंगर ४ मध्ये होते परंतु आता भारत फिंगर ३ वर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फिंगर ४ चीनला दिले? तसेच भारतीय जवानांनी कैलास पर्वतावर वर्चस्व प्रस्थापित केले होते. परंतु त्यांना मागे का बोलवण्यात येत आहे? भारतची पवित्र भूमी चीनला का दिली असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला घाबरले, त्यांच्या भूमिकेचं समर्थन होऊ शकत नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. चीनसोबतच्या विषयावर चर्चा करण्यासाठी सरकार कधीही चर्चेला तयार होणार नाही. चीन समोर मोदी झुकले असल्याचे दिसत आहे. रक्षामंत्री यांनीही दिपसांग या भुमीबाबत काही बोलले नाहीत. गोगरा आणि हॉटस्प्रिंगच्या प्रश्नांवरही वक्तव्य केले आहे. चीनी सैनिक तेथे बस्तान मांडून बसले आहेत. काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भारत-चीन संघर्षावर चौफेर टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाबरट आहेत. मोदी चिनसमोर झुकले आहेत. रक्षामंत्री यांनीही दिपसांग सीमारेषा प्रकरणी काही वक्तव्य केले नाही. तिकडेही चिनी सैनिक ठाण मांडून बसले आहेत. गुरुवारी रक्षामंत्री यांनी पूर्व लडाखमधील स्थितीवर वक्तव्य केले होते. लडाखमध्ये फिंगर ४ वरुन भारतीय जवान फिंगर ३ वर येत आहे. त्यामुळे आपले क्षेत्र चीनला का दिले असा प्रश्न राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

तसेच रक्षामंत्री यांनी दिपसांग बाबत एक शब्दही काढला नाही. दिपसांग हा महत्त्वपूर्ण भाग आहे. इथूनच चीनने प्रवेश केला होता. त्यामुळे हे सत्य आहे की, मोदींनी चीनला भारताची जमीन दिली आहे. त्यामुळे त्यांना देशाला उत्तर द्यावे लागेल. असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधीनी असाही आरोप केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरट आहेत. चीनसोबत संघर्ष करण्यात मोदी असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे ते आपल्या देशाच्या जवानांच्या बलिदानाचा अपमान करत आहेत. देशाची सुरक्षा करणे प्रधानमंत्र्यांची जबाबदारी आहे तसेच ही जबाबदारी ते कसे पुर्ण करणार हा त्यांचा प्रश्न आहे. असे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

- Advertisement -

अध्यक्षांच्या परवानगीविनाच २ मिनिटांचे मौन ठेवले

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी लोकसभेत संसदेच्या नियमांचे उल्लंघन केले. राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्षांची विनापरवानगीने कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांसाठी २ मिनिटांचे मौन ठेवले होते. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभा अध्यक्षांनी म्हटले आहे की, संसद चालवणे माझी जबाबदारी आहे. तसेच परवानगी घेतल्याशिवाय असा प्रकार करु नये. जर राहुल गांधींना मौन ठेवायचा होता तर त्यांनी त्याची परवानगी घ्यायला हवी होती.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -