Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी एकनाथ खडसेंची बालेकिल्ल्यातच कोंडी? संवाद यात्रेच्या बॅनरवर खडसे गायब

एकनाथ खडसेंची बालेकिल्ल्यातच कोंडी? संवाद यात्रेच्या बॅनरवर खडसे गायब

Related Story

- Advertisement -

भाजप पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन एकनाथ खडसे यांना अवघे तीन महिने झाले आहेत. पण एकनाथ खडसे यांना पक्षात जरी स्थान मिळालं असलं तरी जिल्ह्यातल्या जुन्या नेत्यांच्या बॅनवरवर खडसेंना अजूनही स्थान मिळालं नसल्याचं चित्र समोर आलं आहे. जळगावात गुलाबराव देवकरांनी लावलेल्या बॅनवरवर एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसेंचा फोटो गायब झाला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक याबाबत चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज संवाद यात्रे निमित्त जळगाव जिल्ह्यात असणार आहेत. त्यामुळे जयंत पाटलांच्या स्वागतासाठी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी बॅनर लावले आहेत. जळगाव शहरात राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रे निमित्त हे बॅनर विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. या बॅनरवर शरद पवारांसह, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि इतर राष्ट्रवादी नेत्यांचे फोटो आहेत. पण या बॅनरवर एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांचा फोटो नाही आहे.

- Advertisement -

भाजप सोडून राष्ट्रवादी आल्यानंतर या बॅनरवर एकनाथ खडसे यांचा फोटो असणे अपेक्षित होते. मात्र, तसेच काही दिसून आले नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत प्रवेश मिळाला असला तरी गुलाबराव देवकरांच्या मनात खडसे अजूनही विरोधकचं आहेत आणि खडसेंना अजूनही राष्ट्रवादीत स्थान मिळालं नाही आहे का?, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवाय एकनाथ खडसेंच्या बालेकिल्लातच राष्ट्रवादीची गटबाजी दिसून आली आ


हेही वाचा – अन् क्वारंटाईन असलेल्या अजित पवारांनीही लावली खडसेंच्या पक्षप्रवेशाला उपस्थिती


- Advertisement -

 

- Advertisement -