घरदेश-विदेशतिहार कारागृहात जबरदस्तीने मुस्लिम कैद्याच्या पाठीवर कोरले ओम

तिहार कारागृहात जबरदस्तीने मुस्लिम कैद्याच्या पाठीवर कोरले ओम

Subscribe

कैद्याचे नाव नाबीर असून नाबीरने कड़कडडूमा कोर्टामध्ये सुनाणीच्या वेळी कारागृह अधीक्षक राजेश चौहान यांनी आपल्या पाठीवर ओम अक्षर कोरले असा गंभीर आरोप केला आहे.

दिल्लीच्या तिहार जेलमध्ये नुकताच आश्चर्यचकित करणारा प्रकार उघडकीस आला आहे. तिहार जेलमधील एका कैद्याने असा आरोप केला की, कारागृह अधीक्षकाने त्याच्या पाठीवर ओम हे अक्षर कोरले आहे. गरम केलेल्या हत्याराचा वापर करून अधीक्षकाने कैद्याच्या पाठीवर ओम हे अक्षर कोरले. या कैद्याचे नाव नाबीर असून नाबीरने कड़कडडूमा कोर्टामध्ये सुनाणीच्या वेळी कारागृह अधीक्षक राजेश चौहान यांनी आपल्या पाठीवर ओम अक्षर कोरले असा गंभीर आरोप केला आहे.

शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याने कोठडी

या आरोपानंतर कोर्टाने चौकशीचे आदेश दिले आहे. कोर्टाने डीआयजी स्तरावरील अधिकाऱ्यांना या चौकशीचे आदेश दिले असून लवकर अहवाल देण्यात येणार आहे. नाबीर हा कैदी न्यू सीलमपूरचा राहणारा आहे. शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यास तिहार जेल क्रमांक ४ मध्ये ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

कारागृह अधीक्षकाकडून मारहान

नाबीरने केलेल्या आरोपानुसार जेलमध्ये इंडक्शन खराब झाल्याची तक्रार त्याने केली होती. त्यावक कोणतीही कारवाई न झाल्याने वारंवार तक्रारी केल्याने कारागृह अधीक्षक संतापले. नाबीरला बोलावून खूप तक्रारी त्याच्याकडून येत असल्याने कारागृह अधीक्षकाने बेदम मारहान केली, यावेळी गरम केलेल्या लोखंडाने पाठीवर ओम कोरल्याचा आरोप त्याने केला. यासोबत पाठीवर सिगारेटचे चटके देखील देऊन दोन दिवस उपाशी ठेवण्यात आले होते. कारागृह अधीक्षक राजेश चौहान यांनी सर्व आरोप फेटाळले असून या कारागृहातून शिफ्ट होण्यासाठी नाबीरने हे आरोप लावले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -