भारतीयवंशाच्या व्हायरोलॉजिस्ट गीता रामजी यांचा कोरोनामुळे मृत्यू

भारतीयवंशाच्या व्हायरोलॉजिस्ट गीता रामजी (५०) यांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या त्या पहिल्याच भारतीयवंशी व्यक्ती आहेत. गीता या विविध लसींवर संशोधन करणाऱ्या संशोधक होत्या. तसेच त्या एचआयव्ही संशोधन विभागाच्या प्रमुख होत्या.

आठवड्याभरापूर्वीच त्या लंडनहून आल्या होत्या. त्यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षण नव्हती. मात्र अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकिय चाचणीत त्या कोरोना पॉझीटीव्ह आल्या. यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. दक्षिण आफ्रीकेत कोरोनाच्या संसर्गात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर १,३५० जणांना कोरोनाची लागण झाली आहे.