घरदेश-विदेशवर्गात प्रथम येतो म्हणून मुलीच्या वर्गमित्राची केली हत्या, पोलिसांनी महिलेच्या मुसक्या आवळल्या

वर्गात प्रथम येतो म्हणून मुलीच्या वर्गमित्राची केली हत्या, पोलिसांनी महिलेच्या मुसक्या आवळल्या

Subscribe

शाळेतील शिपायाला तिने आपण मणिकंदनची आई असल्याचं सांगून मणिकंदनसाठी दोन ग्लास सरबत पाठवले. कार्यक्रम संपला की त्याला हे सरबत दे, असं या आरोपी महिलेने शिपायाला सांगितलं.

पुदुच्चेरी – आपल्या मुलीपेक्षा जास्त हुशार असल्याने एका आईने मुलीच्या वर्गमित्राचीच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुद्दुचेरीतील कराईकल येते हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलीच्या वर्गमित्राला सरबतामध्ये विष टाकून प्राशन करण्यास दिले. शनिवारी रात्री या मुलाचा मृत्यू झाला. तसंच, तत्काळ या मृत्यूमागचा छडा लागल्याने सगयारानी व्हिक्टोरिया या ४३ वर्षी आरोपी महिलेला रविवारी पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा मिशन 150 : मुंबईवर भाजपाचे वर्चस्व असावे; अमित शाहांचा शिंदे गटालाही शह

- Advertisement -

१३ वर्षी मणिकंदन हा वर्गातील सर्वांत हुशार विद्यार्थी होता. आरोपीच्या मुलीपेक्षाही त्याला जास्त चांगले गुण मिळायचे. तसेच, तो नेहमी वर्गात प्रथम क्रमांकाने पास व्हायचा म्हणून आरोपी महिलेच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली. शुक्रवारी शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनात ही महिला शाळेत पोहोचली. शाळेतील शिपायाला तिने आपण मणिकंदनची आई असल्याचं सांगून मणिकंदनसाठी दोन ग्लास सरबत पाठवले. कार्यक्रम संपला की त्याला हे सरबत दे, असं या आरोपी महिलेने शिपायाला सांगितलं.

दरम्यान, आरोपीने सांगितल्याप्रमाणे शिपायाने त्या मुलाला सरबताचा ग्लास नेऊन दिला. मुलानेही ते सरबत प्राशन केले. मात्र, घरी जाताच मुलाला उलट्या होऊ लागल्या. त्याच्या आई-वडिलांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. उपचार केल्यानंतर रात्रीच त्याला डिस्चार्जही मिळाला. मात्र, शनिवारी पुन्हा त्याला ताप आला तेव्हा त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

- Advertisement -

हेही वाचा – पंजाबमधील जत्रेत 50 फूट उंचीवरून कोसळला पाळणा, 16 जण जखमी

सरबत प्यायल्यानंतर त्याला उलटी होत असल्याचं मणिकंदनने त्याच्या आईला सांगितलं होतं. त्यामुळे त्याचा मृत्यू होताच त्याच्या आईला संशय आला. तिने लागलीच कराईकल टाऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही याप्रकरणी तत्काळ चौकशीला सुरुवात केली. सर्वांत आधी पोलिसांनी शाळेच्या शिपायाला ताब्यात घेतलं. तसंच, चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सगयारानी हिला ताब्यात घेतलं गेलं. घरगुती औषध पाजलं असल्याने त्याला उलट्या झाल्या असतील असा दावा आरोपी महिलेने केला होता.

आपल्याला शाळेत सरबत पाजलं गेलं, असं मुलाने आधी आपल्या आईला सांगितलं नसतं तर कदाचित आरोपी महिलेपर्यंत पोलीस पोहोचू शकले नसते. किंवा हा विषबाधेचा प्रकार आहे, हेसुद्धा सिद्ध होऊ शकले नसते. दरम्यान, याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने आरोपी महिलेला चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावणी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -