घरदेश-विदेशपुलवामा चकमकीत खात्मा केलेल्या ४ दहशतवाद्यांमध्ये दोन पोलीस अधिकारी

पुलवामा चकमकीत खात्मा केलेल्या ४ दहशतवाद्यांमध्ये दोन पोलीस अधिकारी

Subscribe

दहशतवाद्यांची ओळख आशिक अहमद, इमरान अहमद, शब्बीर अहमद आणि सलमान खान अशी आहे. यामधील शब्बीर आणि सलमान हे दोघे जण पोलीस अधिकारी होते.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या चकमकीमध्ये जवानांना जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. महत्वाचे म्हणजे या दहशतवाद्यांमद्ये दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे दोन पोलीस अधिकारी आपले शस्त्र घेऊन गुरुवारी फरार झाले होते. त्यानंतर ते दहशतवाद्यांना जाऊन भेटले होते. पुलवामाच्या लासिपोरा भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुरुवारी लष्कर, सीआरपीएफ जवान आणि पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेत सर्च ऑपरेश सुरु केले होते. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली.

अशी झाली चकमक

या चकमकी दरम्यान दोन पोलीस अधिकारी रायफल घेऊन पोलीस लाईनपासून फरार झाले. त्यानंतर दहशतवाद्यांसोबत भेटून त्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. एका दहशतवाद्याला जवानांनी गुरुवारी संध्याकाळी ठार केले. त्यानंतर एक दहशतवादी आणि दोन फरार झालेले पोलीस अधिकारी यांना शुक्रवारी सकाळी घेरावबंदी दरम्यान जवानांनी ठार केले. जवळपास १२ तास चाललेल्या या चकमकीत जवानांना ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले.

- Advertisement -

४ दहशतवाद्यांमध्ये दोन पोलीस अधिकारी

दहशतवाद्यांची ओळख आशिक अहमद, इमरान अहमद, शब्बीर अहमद आणि सलमान खान अशी आहे. आशिक अहमद हा पुलवामाच्या पंजरान येथे राहणार आहे. तर इमरान अहमनद हा अरिहल येथे राहणारा, शब्बीर अहमद हा तुजान येथे राहणारा आणि सलमान खान हा कीगाम येथे राहणारा आहे. यामधील शब्बीर आणि सलमान हे दोघे जण पोलीस अधिकारी होते. ठार करण्यात आलेल्या ४ ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. ठार केलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे होते. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या ऑपरेश ऑल आऊटमध्ये यावर्षी आतापर्यंत ११० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

जम्मू-काश्मीरच्या सोपोर पोलीस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला; दोन पोलीस गंभीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -