घरमहाराष्ट्रअखेर प्रतीक्षा संपली; दहावीचा निकाल होणार उद्या जाहीर

अखेर प्रतीक्षा संपली; दहावीचा निकाल होणार उद्या जाहीर

Subscribe

दहावीचा निकाल शनिवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन होणार जाहीर

दोन दिवसांपासून सोशल मीडियावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीच्या निकालाच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या. त्यामुळे इयत्ता दहावीचे विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत असतांनाच या अफवांमुळे विद्यार्थांसह पालकांची ही धास्ती वाढली होती. या संदर्भातील अनेक अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जात होत्या. या सर्व अफवांवर अधिक पसरवल्या जात असल्याने बोर्डाकडून याबाबत गुरूवारी खुलासा देण्यात आला होता मात्र आज बोर्डाकडून ८ जून रोजी निकाल जाहीर होईल, असे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे.

बोर्डाकडून अधिकृत घोषणा 

उच्च माध्यमिक अर्थात बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर बोर्डाकडून ८ जून रोजी निकाल जाहीर होणार अशी अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकालाची प्रतीक्षा अखेर आज संपली आहे.

- Advertisement -

उद्या होणार निकाल जाहीर

दहावीचा निकाल शनिवारी दुपारी १ वाजता हा ऑनलाइन जाहीर करण्यात येणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. मंडळाकडून दुपारी ११ वाजता निकालाची सांकेतिक माहिती जाहीर करण्यात येणार असून मंडळाने जाहीर केलेल्या वेबसाईटवर दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे.

खालील संकेतस्थळांवर निकाल येणार पाहता

www.maharesult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeduction.com
www.mahrashtra12.jagranjosh.com

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -