पंजाब काँग्रेसचे नेते सुनील जाखड यांचा भाजपमध्ये प्रवेश

Punjab Congress leader Sunil Jakhar joins BJP
Punjab Congress leader Sunil Jakhar joins BJP

पंजाब काँग्रेसचे नेते सुनील जाखड यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालायत त्यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांना सदस्यत्व दिले. त्यांचे वडील बलराम जाखड हे ही काँग्रेसचे नेते होते. सुनील जाखड यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसच्या चिंतन शिबिरात सुनील जाखड यांनी भावनिक वक्तव्य करत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

मी पंजाबच्या बंधुत्वासाठी लढत आहे. जे काम एके-४७ च्या गोळ्या करू शकल्या नाहीत, ते काम त्यांनी (काँग्रेस) आपल्या जिभेने करून दाखवले. त्यांनी केवळ हिंदू बांधवाचाच नव्हे तर शीख बांधवाचाही अपमान केला, असे सुनील जाखड यांनी भाजपा पक्ष प्रवेशानंतर म्हटले आहे.

काँग्रेसमध्ये असतानाही ते वेगळ्या प्रतिमेचे नेते होते. सुनील जाखड यांनी नेहमीच शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. आज पंजाबमधील राष्ट्रवादी शक्तींमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे. मला खात्री आहे की त्यांच्यासोबत भाजपा पंजाबला एका नव्या उंचीवर नेईल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले.