Musewal murder case : मूसेवाला हत्या प्रकरणात पंजाब पोलिसांनी ‘केकडा’ला केली अटक

Punjab police have arrested a man named Kekada in connection with the murder of Musewala
Moose Wala murder case : मूसेवाला हत्या प्रकरणात पंजाब पोलीसांनी 'केकडा'ला केली अटक

पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात (Moose Wala murder case) पंजाब पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी गाडी पुरवणाऱ्या केकडा नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. मानसा पोलीस केकडाची चौकशी करत आहेत.

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) हत्या प्रकरणात पंजाब पोलिसांनी 4 संशयीत लोकांना अटक केली आहे. मानसा पोलिसांनी गाड्या पुरवणाऱ्या केकडा या व्यक्तीला अटक केली आहे. या आधी पोलिसांनी रविवारी रात्री हरियाणा येथील दविंदर ऊर्फ काला याला पकडले आहे. हत्येत सहभागी असलेले दोन संशयीत काला बरोबर होते.

हेही वाचा – सिद्धू मूसेवाला हत्येनंतर पंजाब सरकार ताळ्यावर, ४२४ लोकांना पुन्हा सुरक्षा पुरवणार

या आधी पोलिसांनी तीन जूनला फतेहाबाद येथे संशयीत व्यक्तीला पकडले आहे. मूसेवाला हत्येत त्यांचा काय सहभाग होता याबद्दल चौकशी केली जात आहे. मूसेवालांच्या हत्येनंतर (Moose Wala murder case) पोलिसांनी दोन दिवसात या व्यक्तीला अटक केली होता. अटक आरोपी मनप्रीत सिंह यांच्यावर हल्लेखोराना हत्यारे पुरवल्याचा आरोप आहे.

काय घडले होते –

सिद्धू मूसेवालाची 29 मे रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात गोळ्याघालून हत्या करण्यात आली होती. जेव्हा सिद्धू आपल्या मित्रांबरोबर स्वत: गाडी चालवत अपल्या मावशी कडे भेटण्यासाठी जात होते. तेव्हा मानसा जिल्ह्यातील जवाहर गावाजवळ शूटरने त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी मूसेवालाच्या गाडीवर अंदाधुंध गोळीबार केला. त्यांनतर सिद्धू मूसेवाला यांचा मृत्यू झाला. गाडीतील त्याचे मित्र जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; शवविच्छेदनाच्या अहवालात मोठा खुलासा

गोल्डी बराड यांने घेतली हत्येची जबाबदारी –

सिद्धू मूसेवालाच्या हत्या प्रकरणात लॉरोस बिश्नोई टोळीचा हात होता, असे पोलिसांनी सांगीतले. गिरोहचे सदस्य कॅनडात राहणाऱ्या गोल्डी बराड यांने मूसेवालाच्या हत्येची जाबाबदारी घेतली आहे.

सुरक्षा काढताच झाला हल्ला –

पंजाब सरकारने  सुद्धू मूसेवालाची सुरक्षा काढली होती. याच्या एक दिवसानंतर ही घटना घडली. मुसेवाला त्या 424 लोकांमध्ये होते ज्यांची सुरक्षा पंजाब पोलिसांनी काढली होती.