घरदेश-विदेशRafale deal : '९ टक्के स्वस्त दरानं राफेल खरेदी'

Rafale deal : ‘९ टक्के स्वस्त दरानं राफेल खरेदी’

Subscribe

राफेल करारावरून सत्ताधारी भाजपनं आता काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे.

राफेल करारावरून उठलेलं वादळ अद्याप देखील शमलेलं नाही. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पंधरावा दिवस आहे. आजच्या दिवशी देखील संसदेमध्ये राफेल करारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याची पाहायाला मिळाली. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांनी काँग्रेसनं केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी युपीए सरकार राफेलच्या खरेदीबाबत उदासिन होतं. शिवाय, त्याची किंमत देखील जास्त होती. पण, भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर राफेल विमान खरेदीमध्ये गती आली. शिवाय, युपीएपेक्षा ९ टक्के कमी दरानं राफेल विमानांची खरेदी केली गेली. अशा शब्दात संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. राफेल करारावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राफेल करारावरून काँग्रेसनं सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. आता हिवाळी अधिवेशनामध्ये देखील राफेल करारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायाला मिळत आहे.

वाचा – राफेल प्रकरण- राहुल गांधींनी पुन्हा साधला सरकारवर निशाणा

दोनच दिवसांपूर्वी लोकसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांनी राफेल करारावरून जोरदार घोषणाबाजी केली होती. यावेळी अंबानी आणि क्वात्रोची यांच्या नावाच्या घोषणा देखील दिल्या गेल्या होत्या. शिवाय, कागदी विमानं देखील संसदेमध्ये उडवली गेली होती. त्यानंतर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी कामकाज देखील तहकूब केलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -