घरताज्या घडामोडीFarmers Protest: शेतकऱ्यांच्या नावासमोर हुतात्मा लावलं जाईल तेव्हा.... राहुल गांधींचा मोदी सरकारवर...

Farmers Protest: शेतकऱ्यांच्या नावासमोर हुतात्मा लावलं जाईल तेव्हा…. राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

Subscribe

राहुल गांधींनी केंद्र सरकारवर सोडलं टीकास्त्र

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज(मंगळवार) शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मागील एका वर्षापासून शेतकरी आपल्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. शांततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलक तीन कृषी कायद्यासाठी विरोध करत आहेत. शेतकरी या आंदोलनामध्ये सर्वच विरोधी पक्षाला पाठींबा देत आहे. विरोधी पक्षाकडून सुद्धा अनेक मार्गांनी प्रदर्शन केलं जातयं. दरम्यान, शेतकऱ्यांच्या नावासमोर हुतात्मा लावलं जाईल तेव्हा.., असं म्हणत राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

ट्विटमध्ये राहुल गांधींनी काय म्हटलंय?

शेतकर्‍याच्या नावापुढे हुतात्मा लावावा लागतो तेव्हा समजून जा. की सरकारच्या क्रूरतेने सीमा ओलांडली आहे. तसेच अन्नदाता सत्याग्रहाला सलाम असं ट्विट राहुल गांधीनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर केलंय.

- Advertisement -

काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाकडून शेतकरी आंदोलनावर सतत टीकेची झड उडवली जात आहे. आगामी काळात २६ नोव्हेंबर रोजी यूपी, पंजाब आणि हरियाणासह राज्यातील शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. दरम्यान, दिल्लीच्या सीमवेर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि काही शेतकऱ्यांकडून तीन कृषी कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी मागील ११ महिन्यांपासून करण्यात येत आहे.

- Advertisement -

कृषी कायद्याविरोधात अनेक शेतकऱ्यांकडून आंदोलन केलं जातंय. शेतकरी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ठाम आहेत. परंतु आंदोलनच्या वेळी अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू देखील झाला आहे.

६५० शेतकऱ्यांचा मृत्यू

देशातील अनेक ठिकाणांहून शेतकरी संघटनांचे नेतृत्व करणारे संयुक्त शेतकरी मोचा यांनी शेतकऱ्यांच्या मृत्यूबाबत माहिती दिलीये. आंदोलनच्या दरम्यान ६५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. परंतु सरकारकडून या आकड्यांवर दुर्लक्ष केलं जातंय.


हेही वाचा: दिवाळीनंतर अर्थमंत्र्यांकडून राज्यांना बोनस, केंद्राकडून महाराष्ट्राच्या वाट्याला काय?


मणिपूर मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर शनिवारी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विट करत त्यांनी म्हटलंय की, मणिपूरमध्ये सेनेच्या ताफ्यावर आतंकवादी हल्ले झाले. मोदी सरकार राष्ट्राची सुरक्षा करण्यासाठी असमर्थ ठरत आहे. तसेच शहीद झालेल्या जवांनाना राहुल गांधींनी श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांचं बलिदान माझ्या कायम लक्षात राहील,असं देखील राहुल गांधींनी म्हटलं आहे.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -