घरताज्या घडामोडीफेसबुक, व्हाट्सअ‍ॅपवर भाजप-संघाचा ताबा; खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवतात - राहुल गांधी

फेसबुक, व्हाट्सअ‍ॅपवर भाजप-संघाचा ताबा; खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवतात – राहुल गांधी

Subscribe

भारतात लोकप्रिय असलेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. फेसबुक सत्ताधारी भाजपला अनुकूल अशी भूमिका घेत असल्याचा ठपका प्रसिद्ध द वॉल स्ट्रीट जर्नलने ठेवला आहे. यावरुन आता कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) वर निशाणा साधला आहे. भाजप, आरएसएस भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपचं नियंत्रण करतात. ते या माध्यमातून खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवतात, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधींनी एका वृत्तपत्राच्या वृत्ताचा हवाला देत भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. ‘भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर भाजप आणि आरएसएसचं नियंत्रण आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी याचा उपयोग करतात, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

फेसबुक कर्मचार्‍यांच्या हवाल्यानुसार अहवालात असं म्हटलं आहे की भारतात असे बरेच लोक आहेत जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर द्वेष पसरवतात. कर्मचारी म्हणतात की आभासी जगात द्वेषाच्या पोस्ट शेअर केल्याने वास्तविक जगात हिंसा आणि तणाव वाढतो.

काय आहे प्रकरण?

अमेरिकन वृत्तपत्र द वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका अहवालात असं म्हटलं आहे की भारतीय जनता पक्षाचे नेते टी. राजा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये रोहिंग्या मुस्लिमांना गोळ्या घालण्याची सूचना केली होती. मुस्लिमांना देशद्रोही म्हणवून मशिदी पाडण्याची धमकी दिली गेली. याला फेसबुक कर्मचाऱ्याने विरोध दर्शविला आणि कंपनीच्या नियमांविरूद्ध असल्याचं म्हटलं होतं. तथापि, भारतात कंपनीच्या वरिष्ठ कर्मचार्‍यांकडून कोणतीही कारवाई केली गेली नाही. आता फेसबुकच्या विश्वासार्हतेबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

- Advertisement -

आता फेसबुकवरच प्रश्नचिन्ह

या अहवालावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांना प्रश्न विचारले. दिग्विजय सिंह यांनी रविवारी ट्विट करत प्रश्न विचारले आहेत. “मार्क झुकरबर्ग कृपया यावर चर्चा करा. पंतप्रधान मोदींचे समर्थक अंखी दास यांची फेसबुकवर नियुक्ती करण्यात आली होती, ज्यांनी सोशल मीडियावर मुस्लिम विरोधी पोस्टना आनंदाने मंजुरी देतात. आपण सिद्ध केलं आहे की आपण जे उपदेश करता त्याचं आपण अनुसरण करत नाही,” असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) देखील फेसबुकला घेरलं आहे. माकपने सवाल केला आहे की फेसबुकने भाजपसोबत द्वेष पसरविला आहे का? आणि निवडणुकांच्या मुद्द्यांना बाजूला सारले आहे का? वॉल स्ट्रीट जनरलच्या अहवालात फेसबुक कर्मचारी असं बोलले आहेत की अशा भाषणाला आळा घातल्याने फेसबुकच्या व्यावसायिक हितसंबंधांचे नुकसान होईल.


हेही वाचा – भाजपवर फेसबुकची कृपा, नेत्यांच्या हिंसा भडकावणाऱ्या पोस्टवर कारवाईस नकार


 


हेही वाचा – निवृत्ती जाहीर करण्याआधी धोनी कुठे आणि काय करत होता?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -