घरअर्थजगतपरदेशी कंपन्यांना भारतीय कंपनींचा ताबा घेण्याची परवानगी देऊ नका - राहुल गांधी

परदेशी कंपन्यांना भारतीय कंपनींचा ताबा घेण्याची परवानगी देऊ नका – राहुल गांधी

Subscribe

देशात सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी मोदी सरकारला आवाहन केलं आहे.

कोरोना विषाणू देशात कहर करत आहे. कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) म्हटलं होतं की, कोरोना विषाणूचा परिणाम देशाला भविष्यातही होणार आहे आणि लॉकडाऊनचा थेट परिणाम देशाच्या आर्थिक कामांवर होईल. आयएमएफने असा दावा आहे की, २०२० हे वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी खूप वाईट आहे. आयएमएफचा अंदाज आहे की यावर्षी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये १९३० च्या महामंदीनंतरची सर्वात मोठी घसरण असेल. दरम्यान, कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सरकारला आवाहन केलं आहे की, राष्ट्रीय संकटाच्या काळात परदेशी कंपन्यांना कोणत्याही भारतीय कंपनीचा ताबा घेण्याची परवानगी देऊ नये.

कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करुन सरकरला सल्ला दिली आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करून लिहलं आहे की, ‘तीव्र आर्थिक मंदीमुळे अनेक भारतीय कॉर्पोरेट्स क्षेत्र कमकुवत झाले आहेत. संकटकाळात सरकारने परदेशी कंपन्यांना कोणत्याही भारतीय कंपनीचा ताबा घेण्यास परवानगी देऊ नये.’ चीनमधील सेंट्रल बँकेने भारतातील सर्वात मोठी कर्ज देणारी कंपनी हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये १.०१ टक्के शेअर विकत घेतले आहेत, असं वृत्त समोर आलं आहे.

- Advertisement -


हेही वाचा – CoronaVirus: मुंबईत २४ तासात २१७ नवे रुग्ण, आकडा १३९९वर!

- Advertisement -

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) देखील जीडीपीबाबत इशारा दिला आहे. आरबीआयने आर्थिक धोरण अहवाल जारी केला आहे. कोरोनाममुळे जागतिक उत्पादन, पुरवठा, व्यापार आणि पर्यटनावर विपरीत परिणाम होणार आहे, असं आरबीआयने म्हटलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -