घरदेश-विदेशजे काम शत्रूंनी नाही केले ते मोदींनी केले - राहुल गांधी

जे काम शत्रूंनी नाही केले ते मोदींनी केले – राहुल गांधी

Subscribe

‘देशाची अर्थव्यवस्था रोखली जावी आणि अर्थव्यवस्था खिळखिळी व्हावी यासाठी देशाच्या शत्रूंकडून संपूर्ण प्रकारचे प्रयत्न केले गेले. मात्र, भारतीयांनी लढाई लढली आणि शत्रूंना रोखले. मात्र, जे काम शत्रूंनी नाही केले तेच काम आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले’, असे राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसने आज दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन धरणे आंदोलन केले. या आंदोलनानंतर राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेत त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली.

नागरिकत्व कायद्याविरोधात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात काँग्रेसने सोमवारी महात्मा गांधी समाधीस्थळ, राजघाट येथे सत्ताग्रह आंदोलन केले. यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांनी घटनेची प्रस्तावना वाचून दाखवली. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मध्य प्रदेशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू केला जाणार नाही, अशी घोषणा केली.

- Advertisement -

हेही वाचा – शिवसेना महिला आघाडीचा आक्रोश; अमृता फडणवीस यांच्या फोटोला मारले जोडे


राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध केला. हा कायदा लोकशाहीसाठी धोका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कायद्यावरून देशवासियांची दिशाभूल करत आहेत. केंद्राचा अजेंडा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आहे, अशी टीका गहलोत यांनी यावेळी केली.

- Advertisement -

हा कायदा संविधानाच्या विरोधात – प्रियंका गांधी

दरम्यान, काँग्रेसने नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला ’असंविधानिक’ म्हणत, या कायद्याला कडाडून विरोध केला. पक्षाच्या सचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी शनिवारी बोलताना सांगितले की, हा कायदा संविधानाच्या विरोधात आहे. जनतेचा आवाज दाबण्यासाठी सरकारकडून एकाधिकारशाही अवलंब होत आहे. नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि एनआरसीच्या नावाने गरिबांवर अत्याचार करण्यात येत आहे. काँग्रेस नेते वेणुगोपाल यांनी सांगितले की, आज महात्मा गांधींच्या समधीस्थळावर आंदोलन करण्यात येत आहे. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने तरूणांवर आणि विद्यार्थांवर शक्तीचा प्रयोग केला, त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -