घरदेश-विदेशराहुल गांधींना म्हटले मीर जाफर, संबित पात्रांविरुद्ध एफआयआर नोंदवणार

राहुल गांधींना म्हटले मीर जाफर, संबित पात्रांविरुद्ध एफआयआर नोंदवणार

Subscribe

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी वक्तव्य केले होते की, राहुल गांधींना माफी मागावी लागेल आणि आम्ही त्यांच्याकडून माफी मागून घेऊ. पात्रांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, शाह आणि शहेनशहा यांना माहित आहे की, राहुल गांधी माफी मागणार नाहीत. त्यानंतरही भाजपचे प्रवक्ते आंघोळ न पत्रकार परिषद घेत असतात.

खेरा म्हणाले की, जे लोक 9 वेळा नाक घासून इंग्रजांची माफी मागतात आणि ज्यांना वाइसरॉयकडून पेन्शन मिळते, ते काँग्रेसला देशभक्तीचे ज्ञान देत आहेत, हे हास्यास्पद आहे. सरकारवर टीका म्हणजे देशावर टीका नाही. सध्याचे सरकार लोकशाहीचे भाडेकरू आहेत, जमीनदार नाही. कारण मालक जनता आहे.

- Advertisement -

लोकशाहीचे जयचंद बनू नका
राहुल गांधी पंतप्रधानांच्या मित्राबाबत प्रश्न विचारत असल्याने हे नाटक घडत असल्याचे खेरा म्हणाले आहेत. राहुल गांधी पंतप्रधानांसमोर अदानीचा उल्लेख करतील याची त्यांना भीती आहे. त्यामुळे तुम्ही लोकशाहीचे जयचंद बनू नका. देशा ऐवजी मित्राची चिंता कराल तर इतिहासात तुम्हाला जयचंद म्हणून संबोधले जाईल.

मीर जाफर वक्तव्यानंतर पात्रांवर कारवाई!
संबित पात्रा यांनी यापूर्वी राहुल गांधींची तुलना मीर जाफरशी केली होती. पात्रा म्हणाले होते, “राहुल गांधी हे आजच्या राजकारणातले मीर जाफर आहेत. मीर जाफरने नवाब बनण्यासाठी जे केले आणि राहुल गांधींनी लंडनमध्ये जे केले… ते दोन्ही सारखेच आहे.” त्यामुळे आजच्या मीर जाफरला माफी मागावी लागेल. राजपुत्राला नवाब व्हायचे आहे आणि त्यासाठी तो परकीय शक्तींची मदत घेत आहे. राजकुमार… हे चालणार नाही.”

- Advertisement -

संबित पात्रांविरुद्ध एफआयआर नोंदवणार!
राहुल गांधींना मीर जाफर म्हटल्याबद्दल पात्रा यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पवन खेरा म्हणाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसशासित राज्यात संबित पात्रा यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची तयारी सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -