घरताज्या घडामोडीमुंबई लोकल सेवा सुरु होण्यासंबंधी संभ्रम; केंद्र सरकारने दिली माहिती

मुंबई लोकल सेवा सुरु होण्यासंबंधी संभ्रम; केंद्र सरकारने दिली माहिती

Subscribe

मुंबई लोकल सेवा सुरु होण्यासंबंधी सर्वसामान्यांमध्ये संभ्रम असून याबाबत केंद्र सरकारने माहिती दिली आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. या कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता भारतीय रेल्वेने मेल, एक्सप्रेस, प्रवासी वाहतूक आणि उपनगरीय रेल्वे सेवा बंद केली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद असणारी मुंबई लोकल कधी सुरु होणार? हा प्रश्न सर्वांना सतावत आहे.

दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई लोकल सुरु होण्यासंबंधी अनेक चुकीच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमधील संभ्रम वाढत आहे. मात्र, आता केंद्र सरकारने मुंबई लोकल अजून तरी बंदच राहणार असल्याचे सांगितले आहे. सरकारकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे अधिकृत माहिती देण्यात आली असून त्यात म्हटले आहे की, नियमित प्रवासी तसेच उपनगरी रेल्वे पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार आहेत.

- Advertisement -

२३० विशेष ट्रेन सुरु

‘पुढील आदेश येईपर्यंत नियमित प्रवासी तसेच उपनगरीय रेल्वे सेवा बंद राहणार आहे. ही बाब सर्वांच्या निदर्शनास आणू इच्छित आहोत. २३० विशेष ट्रेन सध्या धावत असून त्या सुरुच राहणार असल्याची नोंद घ्यावी.

राज्य सरकारच्या विनंतीनुसार मुंबईत सध्या मर्यादित लोकल ट्रेन धावत असून त्या सुरु राहणार आहेत. धावत असणाऱ्या विशेष ट्रेन्सवर नजर असून गरजेप्रमाणे त्यांची संख्या वाढवली जाईल. मात्र, लॉकडाउनच्या आधी धावणाऱ्या सर्व नियमित प्रवासी आणि उपनगरीय रेल्वे पुढील आदेश येईपर्यंत बंद असतील’.

- Advertisement -

हेही वाचा – Sushant Case : रियाला दिलासा नाही; सुप्रीम कोर्टाने ‘त्या’ याचिकेवरील निर्णय ठेवला


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -