घरताज्या घडामोडीसर नाही, आतापासून तुम्ही मला बॉस म्हणायचं, रेल्वेमंत्री वैष्णव यांचा कार्यालयातील व्हिडिओ...

सर नाही, आतापासून तुम्ही मला बॉस म्हणायचं, रेल्वेमंत्री वैष्णव यांचा कार्यालयातील व्हिडिओ व्हायरल

Subscribe

आजपासून तुम्ही मला बॉस म्हणायचं आमच्या कॉलेजमध्ये बॉस म्हणायची पद्धत होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर सर्व मंत्री आपल्या कामाला लागले आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांनी कार्यभार स्वीकरल्यानंतर लगेच रेल्वे कर्मचाऱ्यांना २ शिफ्टमध्ये काम करण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वेमंत्रालयात अधिक काम होण्यासाठी वैष्णव यांनी कर्मचाऱ्यांना २ शिफ्टमध्ये काम करण्यास सांगितले आहे. अशातच वैष्णव यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. एका इंजिनिअरसोबत केलेल्या संभाषणात वैष्णव यांनी मला सर नाही तर आतापासून मला बॉस म्हणायचं अस सांगत आहेत. कर्मचाऱ्यांशी मारत असलेल्या गप्पांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांशी गप्पा मारल्या आहेत. मंत्रालयातील कर्मचारी अधिकाऱ्यांसोबत गप्पा मारत असलेला वैष्णव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये वैष्णव आपल्या कर्मचाऱ्यांसोबत गप्पा मारत आहेत. खूप चांगला काम करुया, असं काम करुयात की खूपच मजा येईल. अस वाटलं पाहिजे की काम करुन मजा आली. असे वेष्णव यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

दरम्यान या संभाषणात एक कर्मचाऱ्याने वैष्णव यांची ओळख एका कर्मचाऱ्याशी करुन दिली. हा कर्मचारी सिग्नल विभागातील असून रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याच कॉलेजमधून शिक्षण घेतलेला आहे. असे सांगताच वैष्णव यांनी त्या अधिकाऱ्याला जवळ बोलावले आणि मिठी मारली. यानंतर त्यांनी कॉलेजमधील एक आठवण सांगत म्हणाले की, आजपासून तुम्ही मला बॉस म्हणायचं आमच्या कॉलेजमध्ये बॉस म्हणायची पद्धत होती. तिथे ज्युनिअर सीनिअरला सर किंवा नावाने हाक मारायचे नाहीत बॉस म्हणायचे तसंच तुम्ही देखील मला बॉस म्हणायचं असे अश्विनी वैष्णव यांनी म्हणताच कार्यालयात एकच हशा पिकला आहे.

- Advertisement -

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जोधपुरच्या एमबीएम कॉलेजमधून इंजिनिअरींग केली आहे. वैष्णव आईएएस अधिकारी आहेत. त्यांनी सरकारी नोकरी सोडल्यानंतर राकारणात प्रवेश केला.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -