घरदेश-विदेशराजस्थान : बसचा भीषण अपघात, १० जण ठार तर २५ जखमी

राजस्थान : बसचा भीषण अपघात, १० जण ठार तर २५ जखमी

Subscribe

राजस्थानमध्ये बस आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर २५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

राजस्थानच्या बीकानेर येथे बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. या अपघातात १४ जण ठार झाले असून २५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

राजस्थानच्या बीकानेरहून जयपूरला बस निघाली होती. दरम्यान, समोरुन येणाऱ्या ट्रकला बस जोरदार धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, बसच्या पुढील भागाच्या ठिकऱ्या उडाल्या. ट्रक बसला आदळल्यानंतर दोन्ही वाहनांनी अचानक पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून प्रवाशांना बाहेर काढले आहे. या अपघातात १० जण जागीच ठार झाले असून २५ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. सकाळच्या वेळेस हा अपघात झाल्यामुळे अनेक जण झोपेत होते. त्यामुळे अनेकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – पाहा प्रिया वॉरियरचा ग्लॅमरस लूक!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -