घरदेश-विदेशसरकार पाडण्याचा सचिन पायलट यांचा डाव; माझ्याकडे पुरावे - अशोक गेहलोत

सरकार पाडण्याचा सचिन पायलट यांचा डाव; माझ्याकडे पुरावे – अशोक गेहलोत

Subscribe

राजस्थानच्या राजकारणाने आता सामंजस्यातून आरोप – प्रत्यारोपांपर्यंतची मजल मारली आहे. एकमेकांना समजून घेण्याची भाषा करणारे काँग्रेसचे नेते आता उघडपणे तक्रारी मांडू लागले आहेत. सचिन पायलट यांनी मीडियासमोर आपली खदखद मांडल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही सचिन पायलट यांच्याविरोधात गौप्यस्फोट केला आहे. सचिन पायलट स्वतःच राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्याच्या प्रयत्नाता होते, असा आरोप गेहलोत यांनी केला आहे. आमच्या आमदारांना पैशाचे आमिष दाखवले जात असून माझ्याकडे याचे पुरावे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

या आधीही आम्हाला काँग्रेसच्या १० आमदारांना हॉटेलमध्ये ठेवावे लागले आहे. त्यावेळी असे केले नसते तर आज ने मानेसरमध्ये घडते त्याची पुनरावृत्ती झाली असती. रात्री अपरात्री लोकांना पाठवले जात आहे. आणि आता स्वतः षडयंत्रात सहभागी असलेले नेता स्पष्टीकरण देत आहेत, असा आरोप गेहलोत यांनी पायलटवर केला. गेल्या ४० वर्षांपासून मी राजकारणात आहे. नव्या पिढीवर आमचंही प्रेम आहे. शेवटी भविष्य त्यांचंच आहे. नवीन पिढी केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष पद भूषवत आहे. आमच्यावेळी आम्हाला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला होता तो यांनी केला असता तर कळलं असतं, असेही ते म्हणाले.

दरम्यान, गेहलोत यांनी सचिन पायलटला टोलाही लगावला आहे. ते म्हणाले की, उत्तम इंग्लिश बोलणे, प्रसारमाध्यमांना चांगले बाइट देणे, हॅण्डसम दिसणे हेच सर्वकाही नसते. देशासाठी तुमच्या मनात काय आहे, तुमची विचारसरणी, धोरणे आणि कटिबद्धता, प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते, असे ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा –

CoronaVirus चं आणखी एक नवं लक्षण आलं समोर!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -