जम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये बस दरीत कोसळली, 5 ठार, 25 जखमी

मागील 24 तासांत जम्मू विभागात दुसरा मोठा रस्ता अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. जम्मू-काश्मीर विभागातील राजौरी येथे बस दरीत कोसळ्याची घटना घडली आहे. बस दरीत कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून, 25 प्रवासी जखमी झाल्याचे समजते.

मागील 24 तासांत जम्मू विभागात दुसरा मोठा रस्ता अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. जम्मू-काश्मीर विभागातील राजौरी येथे बस दरीत कोसळ्याची घटना घडली आहे. बस दरीत कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून, 25 प्रवासी जखमी झाल्याचे समजते. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी लष्कर, पोलीस आणि स्थानिकांनी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी शर्तीच्या प्रयत्नांनी बचावकार्याला सुरूवात केली आहे. (rajouri bus accident many feared dead jammu to poonch 5 death)

मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून आतापर्यंत 5 मृतदेह सापडले आहेत. तसेच, जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले जात आहे. ही बस जम्मूहून पुंछला जात असताना हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या अपघातानंतर लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.

लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी राजौरी रस्ता अपघातावर शोक व्यक्त केला आहे. “राजोरीतील वेदनादायक दुर्घटना दुःखद आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझे विचार शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. जिल्हा प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे”, असे लेफ्टनंट गव्हर्नर यांनी म्हटले.

दरम्यान, याआधी बुधवारी पुंछमध्ये असाच मोठा रस्ता अपघात झाला होता. पुंछच्या मंडी तहसीलच्या सीमेला लागून असलेल्या सावजियान येथील बुरारी नाला परिसरात भरधाव वेगात असलेली ओव्हरलोड मिनी बस 250 फूट दरीत कोसळली होती. या अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 28 जण जखमी झाले होते. मृतांमध्ये 3 शालेय विद्यार्थी आणि 4 महिलांचा समावेश आहे.

या अपघातात इतर 10 शालेय विद्यार्थीही जखमी झाले आहेत. 6 गंभीर जखमींना उपचारासाठी जम्मूच्या वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 4 जखमींना रस्त्याने काश्मीरला पाठवण्यात आले आहे. ही बस 24 आसनी होती, मात्र त्यात 40 जण होते, असे सांगण्यात येत आहे. सकाळची वेळ असल्याने 13 शाळकरी मुलेही गाडीत होती.


हेही वाचा – ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्रीच आरोप करताहेत हे शहाणपणाचे लक्षण नाही : शरद पवार