घरदेश-विदेशभारीचं हौस! लॉकडाऊनच्या भीतीने जोडप्याने चक्क उडत्या विमानात बांधली लग्नगाठ

भारीचं हौस! लॉकडाऊनच्या भीतीने जोडप्याने चक्क उडत्या विमानात बांधली लग्नगाठ

Subscribe

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एका खास आणि अविस्मरणीय क्षण असतो. यात लग्नाचा गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हणतात. परंतु असे म्हटले म्हणून कोण आकाशात जाऊन लग्न करत नाहीत. मात्र देशात कोरोनाचा कहर पाहता एका जोडप्याने खरोखरचं उडत्या विमानातून आकाशात झेप घेत आपली लग्नगाठ बांधली आहे. सध्या सोशल मीडियावर या लग्नाची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे जिथे लग्नसोहळ्याला केवळ ५० माणसांची परवानगी आहे तेथे चक्क १६१ वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे. सोशल मीडियावर चर्चा होत असलेला हा लग्नसोहळा तामिळनाडूतील दोन मोठ्या व्यावसायिकांच्या मुला-मुलीचा आहे.

- Advertisement -

आपला लग्नसोहळा इतरांपेक्षा अविस्मरणीय व्हावा यासाठी दोन्ही कुटुंबांनी चक्क या जोडप्याचे लग्न उडत्या विमानात लावायचे ठरवले. मदुराई येथील गौरपीलयम येथे राहणाऱ्या एका लाकूड व्यावसायिकाचा मुलगा राकेश याचं लग्न एका उद्योगपतीच्या मुलाशी म्हणजेच दीक्षाशी ठरलं आहे. हा लग्नसोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी दोन्ही कुटुंबाने एका खासगी विमान कंपनीकडे विमान बुक केलं. हे विमान केवळ नातेवाईकांसाठीच बुक करण्यात आलं होतं. त्यामुळे हे लग्न सध्या चर्चेत आले आहे. विमाने आकाशात झेप घेताच राकेशने दीक्षाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधत तिला आयुष्यभराची सोबती केली. या विमानाने मदुरै येथून उड्डाण घेत लग्न सोहळा पार पडल्यानंतर या विमानाने तत्तुकुडी विमानतळावर लँड झाले. परंतु लग्न सोहळा सुरु असताना हे विमान मिनाक्षी अम्मन मंदिराच्याबरोबर वरती घिरट्या घातल होते. या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच धुमाकुळ घातल आहेत.

दरम्यान, लग्न करण्यापूर्वी संपूर्ण वऱ्हाड्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच या वऱ्हाड्यांना विमानात प्रवेश मिळाला, असं खासगी विमान कंपनीकडून सांगण्यात आलं. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या हटके विवाह सोहळ्याला अनेकांनी पसंती दिली असून लाईक्स आणि कमेंटन्सचा अक्षरश: पूर आला आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओला २.५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -