घरदेश-विदेशFarmer protest: शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले राकेश टिकैत कोण आहेत?

Farmer protest: शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले राकेश टिकैत कोण आहेत?

Subscribe

प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर पोलीस दिल्ली सीमेवरील आंदोलकांना हटवायला सुरुवात केली. प्रशासनाच्या कठोरते नंतर गाझीपूर सीमेवर तीन कंपनी सीएपीएफ, ६ कंपनी पीएसी आणि १००० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मात्र, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत आपल्या मागणीवर ठाम राहिले आहेत. गोळ्या घातल्या तरी चालतील पण आंदोलन थांबवणार नाही, असा आक्रमक पवित्रा राकेश टिकैत यांनी घेतला. शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायामुळे राकेश टिकैत यांना अश्रू अनावर झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओनंतर पश्चिम उत्तर प्रदेशसह अनेक जिल्ह्यातील गावातून शेतकरी दिल्लीकडे कूच केली आहे. मात्र, ज्या राकेश टिकैत यांच्या डोळ्यातील अश्रूमुळे शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत, ते राकेश टिकैत नेमके कोण आहेत?

राकेश टिकैत यांना शेतकरी संघर्षाचा वारसा

राकेश टिकैत यांचे वडिल १९८७ मध्ये स्थापन झालेल्या किसान युनियनचे (Bhartiya Kisan Union) अध्यक्ष होते. त्यांच्या मृत्यूनंतर या गादीवर राकेश टिकैत यांचे मोठे भाऊ नरेश टिकैत बसले. यानंतरच राकेश टिकैत यांच्यावर प्रवक्ता ही जबाबदारी सोपवली गेली. ४ जून १९६९ मध्ये जन्मलेल्या राकेश यांनी एलएलबीचं शिक्षण घेतलं आहे.

- Advertisement -

राकेश टिकैत यांना शेतकऱ्यांचा पाठिंबा वारसाने लाभला आहे. त्यांचे वडील महेंद्रसिंग टिकैत हे देखील एक शेतकरी नेते होते. हे कुटुंब अनेक दशकांपासून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष करीत आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांच्या लढाईचे नेतृत्व करणारे टिकैत ४४ वेळा तुरुंगात गेले आहेत. मध्य प्रदेशच्या भूमी न्यायाधिकरण कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनामुळे राकेश टिकैत ३९ दिवस तुरूंगात होते. यासह शेतकऱ्यांचा ऊस दर वाढवण्यासाठी त्यांनी संसद भवनाबाहेर निदर्शनेही केली, त्यानंतर त्यांना तिहार येथे पाठविण्यात आलं. त्यावेळी राकेश टिकैत यांनी संसद भवनाच्या बाहेर ऊस जाळला. याशिवाय राकेश टिकैत हे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत.

मेरठ विद्यापीठातून शिक्षण घेतलं

राकेश टिकैत यांना तीन मुलं आहेत. राकेश टिकैत यांचं लग्न १९८५ मध्ये बागपत जिल्ह्यातील दादरी गावच्या सुनिता यांच्याशी लग्न झाले होते. त्यांच्या तिन्ही मुलांची (एक मुलगा आणि दोन मुली) लग्न झाली आहेत. राकेश टिकैत यांनी मेरठ विद्यापीठातून एमएची पदवी घेतल्यानंतर एलएलबी केलं आहे.

- Advertisement -

टिकैत यांनी लोकसभा निवडणूकही लढवली

२०१४ मध्ये, टिकैत उत्तर प्रदेशच्या अमरोहा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती.

कॉन्स्टेबल होते टिकैत

राकेश टिकैत हे १९९२ मध्ये पोलीस खात्यात कॉन्स्टेबल पदावर होते. राकेश यांच्यावर वडिलांचा मोठा प्रभाव होता. १९९३-९४ मध्ये वडील महेंद्रसिंग टिकैत यांच्या नेतृत्वात लाल किल्ल्यावर शेतकरी आंदोलन सुरू होते, त्यावेळी त्यांनीही यात भाग घेतला. सरकारने आंदोलन संपवण्यासाठी दबाव आणला तेव्हा त्यांनीही पोलिसाची नोकरी सोडली आणि शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहिले. वडील महेंद्र टिकैत यांचे कर्करोगाने निधन झालं.


हेही वाचा – Farmers Protest : सिंघू सीमेवर दगडफेक, जमावानं शेतकर्‍यांचे तंबू उखडले


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -