घरदेश-विदेशFarmers Protest : सिंघू सीमेवर दगडफेक, जमावानं शेतकर्‍यांचे तंबू उखडले

Farmers Protest : सिंघू सीमेवर दगडफेक, जमावानं शेतकर्‍यांचे तंबू उखडले

Subscribe

दिल्ली आणि हरयाणाच्या सिंघू सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सिंघू सीमा ही शेतकरी चळवळीचे मुख्य केंद्र आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली आहे. जमावाने दगडफेक करत शेतकऱ्यांचे तंबू उखडून टाकले आहेत. हा जमाव स्थानिक लोकांचा असल्याचं समजतंय. दगडफेक केल्यानंतर शेतकरी आंदोलक आणि स्थानिकांमध्ये संघर्ष झाला. स्थानिक आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला आहे. या घटनेत एक पोलीस जखमी झाला आहे.

शुक्रवारी दुपारपर्यंत सिंघू सीमेवर मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात होता. पण सुमारे २०० लोक सीमेवर पोहचले आणि दगडफेक केली आणि शेतकर्‍यांचे तंबू उखडले. परिस्थिती बिघडल्यानंतर पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. पोलिसांनी शेतकर्‍यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. इतक्या लोकांचा जमाव आंदोलनाच्या ठिकाणी कसा पोहोचला हे अद्याप समजू शकलेलं नाही. सिंघू सीमेवरील, दिल्ली-उत्तर प्रदेशच्या टिकरी सीमा आणि गाझीपूर सीमेवरही मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. गाझीपूर सीमेवर प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराबद्दल राकेश टिकैत यांची शेतकरी संघटना भारतीय किसान संघटनेने महापंचायत बोलावली आहे.

- Advertisement -

२८ जानेवारीला प्रशासनाकडून गाझीपूर सीमेवर आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांना आंदोलन थांबवण्याचं आवाहन करण्यात आलं. याबाबत किसान आंदोलनाचे प्रवक्ते राकेश टिकैत यांच्याशी चर्चाही करण्यात आली. पण टिकैत यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहून आंदोलनस्थळ रिकामे करणार नसल्याचं म्हटलं. टिकैत यांनी हे आंदोलन सुरूच राहील, असं म्हटल्यानंतर घरी परतलेले शेतकरी पुन्हा आंदोलनस्थळी परतण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता हे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचं टिकैत यांनी सांगितलं.


हेही वाचा – शेतकरी आंदोलनामध्ये मोठी फूट; दोन शेतकरी गटांची आंदोलनातून माघार

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -