घरदेश-विदेश'या' विचित्र आजारामुळे तरुणी २० वर्षांपासून घालतेय हेल्मेट

‘या’ विचित्र आजारामुळे तरुणी २० वर्षांपासून घालतेय हेल्मेट

Subscribe

सध्या जगभरात आपण कोरोना या एका संसर्गजन्य आजराबद्दल बोलत आहोत, ऐकत आहोत. परंतु कोरोना व्यतिरिक्त इतरही असे जीवघेणे आजार आहेत ज्यावर वैद्यकीय शास्त्र देखील अद्याप उपचार शोधू शकलेले नाही. असाच एक आजार एका तरुणीला जडला असून यासाठी तिला चक्क हेल्मेट घालावं लागत आहे.

मोरेक्को येथे राहणाऱ्या फातिमा झारा घाझौइ हिला त्वचेसंबंधी एक दुर्मिळ आजार जडला आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, फातिमाला ‘जेरोडेरमा पिंग्मंतोसम’ नावाचा आजार जडला आहे. हा एक प्रकारचा त्वचेसंबंधीचा दुर्मिळ आजार आहे. या आजरात उन्हाचा स्पर्श हा रुग्णासाठी धोकादायक आहे. त्यामुळे फातिमा विना हेल्मेट उन्हात बाहेर देखील जाऊ शकत नाही. उन्हाचा स्पर्श जरी फातिमाच्या त्वचेला झाला तरी, तो जीवघेणा ठरू शकतो. याच कारणास्तव फातिमा गेल्या २० वर्षांपासून हेल्मेट घालत आहे.

- Advertisement -

हा दुर्मिळ आजार फातिमाला ती १३ वर्षांची असल्यापासून झाला आहे. उन्हाच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे फातिमाच्या चेहऱ्यावर जखमा होऊ लागल्या. इतकंच नव्हे तर, तर त्वचेवरील या जखमा भरून देखील निघत नव्हत्या. फातिमाला झालेल्या या आजाराविषयी तज्ज्ञांनी ही जेनेटिक समस्या असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे फातिमाला या आजराला तोंड द्यावं लागत आहे. या आजरामुळे तिचं शिक्षण देखील अर्धवट राहिलं. पंरतु यावर उपचार नसल्याने फातिमाला या आजारासोबतच जीवन मरणाची लढाई लढावी लागत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -