घरCORONA UPDATECorona Live Update: पुणे शहरात आज १,१६० नव्या कोरोना रुग्णांची नोंद!

Corona Live Update: पुणे शहरात आज १,१६० नव्या कोरोना रुग्णांची नोंद!

Subscribe

आज पुण्यात १ हजार १६० नवे कोरोना रुग्ण असून १६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा ४९ हजार २१७ वर पोहोचली आहे असून यापैकी १ हजार १८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


आज गोव्यात २५८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गोव्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ हजार ११९वर पोहोचली असून यापैकी ३ हजार ४१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या गोव्यात १ हजार ६७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी गोव्याच्या आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.

- Advertisement -


अंबरनाथमध्ये कोरोनाचे ७७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २६ रुग्ण पश्चिम तर ५१ पूर्व भागातील आहेत. आतापर्यंत अंबरनाथमध्ये कोरोनाचे ३५८८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २ हजार ९३३ जणांना उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर ५१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

मुंबईत आज १ हजार ३३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ३९ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १० हजार १२९वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ६ हजार १२९ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


राज्यात गेल्या २४ तासांत ७ हजार ९२४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २२७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख ८३ हजार ७२३वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत १३ हजार ८८३ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


ठाण्यात आज २२६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत आठ्यात ५८० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज ५०३ जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत १२ हजार ८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ५ हजार २९० जणांवर उपचार सुरू आहेत


राज्यात रविवारी एका कोरोनाग्रस्त पोलीस अंमलदाराचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता ९४वर पोहोचली आहे. दुसरीकडे राज्यात सध्या १ हजार ९५२ पोलिसांवर उपचार सुरू असून रविवारी ६७ पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या काही दिवसांत पोलिसांना कोरोनाची लागण होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत ८ हजार ५८४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात ८९२ पोलीस अधिकारी आणि ७ हजार ६९२ पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश होता. त्यापैकी ६७ पोलीस शनिवारी कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये ६६५ पोलीस अधिकारी आणि ५ हजार ८७३ पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

सध्या राज्यात २२० पोलीस अधिकार्‍यांसह १ हजार ७३१ पोलिसांवर उपचार सुरू आहे. रविवारी २०१ पोलिसांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांना जवळच्या खासगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी एका पोलीस अंमलदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे आतापर्यंत राज्यात ९४ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यात सात पोलीस अधिकारी आणि ८७ पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. दुसरीकडे राज्यात आतापर्यंत ३१९ पोलिसांवर जमावाकडून हल्ला झाला असून त्यात ८८१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कोविडसंदर्भात आतापर्यंत १ लाख ८ हजार ४४४ कॉल मुख्य नियंत्रण कक्षाला प्राप्त झाले आहेत. लॉकडाऊननंतर राज्यात १ हजार ३४६ अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले असून याच गुन्ह्यांत ३१ हजार ९९५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ९४ हजार ७५ वाहने जप्त केले आहेत. त्यांच्याकडून १६ कोटी ९८ लाख ४३ हजार ८०४ रुपयांचा दंड वसुल केला आहे.


आज मुंबईतील धारावीत ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून धारावीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ५४०वर पोहोचली आहे. तसेच आज दादरमध्ये २९ तर माहिममध्ये १६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दादरमधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ हजार ६४७ तर माहिममधील १ हजार ६२१वर पोहोचली आहे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत बेड टाकून आंदोलन केले. कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी बेड मिळत नसल्याने तसेच पुण्यात कोरोनाबाधित संख्या वाढता असताना प्रशासनाकडू हव्या तशा सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आहे. या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेने नगरसेवक वसंत मोरे आणि साईनाथ बाब उपस्थित होते.


अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्यांना नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सविस्तर वाचा 

 


Hand Sanitizer चा अतिवापर हानिकारक!

जगभरात कोरोनाचा कहर सुरू असताना त्याच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं आणि हँड सॅनिटायझरने सतत हाथ स्वच्छ करणे असं वारंवार सांगितले जात आहे. मात्र वारंवार हँड सॅनिटायझर वापरल्याने त्वचेला नुकसान होऊ शकतं, त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात असे याआधीही अनेक तज्ज्ञांनी सांगितलं आहे. आता केंद्र सरकारनेही नागरिकांना याबाबत सावधतेचा इशारा दिला आहे. (सविस्तर वाचा)


भारतात कोरोनाचे संकट सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे बाधित झालेल्या लोकांबरोबरच मृतांची संख्याही वेगाने वाढत आहे. देशात आता संसर्ग झालेल्यांची संख्या १४ लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ४९ हजार ९३१ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ७०८ जणांचा मृत्यू देखील झाला आहे. हे मृत्यू अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा सर्वात जास्त आहेत. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये गेल्या २४ तासांत साधारण ४४५ आणि ५५६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारताच्या तुलनेत मेक्सिकोमध्ये (७२९) कमी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


देशात कोरोनाच्या Record Break टेस्टिंग

देशात कोरोना रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रूग्ण ओळखण्यासाठी रेकॉर्ड ब्रेकिंग चाचण्या देशभरात घेण्यात येत आहे. अमेरिका आणि रशिया नंतर भारतात कोरोना बाधित रूग्णांची ओळख पटवण्यासाठी सर्वाधिक चाचण्या घेत आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) नुसार रविवारी, २६ जुलै रोजी देशभरात एकूण ५ लाख ५४ हजार ४७२ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून त्या एकाच दिवसातील आतापर्यंतची सर्वात जास्त घेण्यात आलेल्या चाचण्या असल्याचे सांगण्यात येत आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असताना लॉकडाऊनचं काय होणार? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. आज दिवसभरात राज्यात एकूण ९ हजार ४३१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या ३ लाख ७५ हजार ७९९ इतकी झाली आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ६०१ अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या आहे. तर आजपर्यंत २ लाख १३ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ६ हजार ४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दिवसभरातला मृतांचा आकडा देखील चिंता वाढवणारा असून दिवसभरात एकूण २६७ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या १३ हजार ६५६ इतकी झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -