घरदेश-विदेशसावधान ! जुन्या नोटा - नाणी खरेदी विक्रीच्या आमिषाला बळी पडू नका,...

सावधान ! जुन्या नोटा – नाणी खरेदी विक्रीच्या आमिषाला बळी पडू नका, RBI जारी केली नोटीस

Subscribe

अनेकांना जुनी नाणी आणि नोटा जमावण्याचा छंद असतो. या छंदाचा फायदा घेत अनेक जण आपल्याजवळील जुन्या नोटा आणि नाणी सर्वाधिक किंमतींना विकतात. सोशल मीडियावरही जुनी नाणी, नोटा विकून लखपती किंवा करोडपती व्हा. अशा जाहिराती झळकत असतात. या नोटा आणि नाणी जितक्या जुन्या तितकी किंमत वाढत जाते. काही वेबसाइट्स आहेत जिथे १ रुपयांची नोट किंवा नाणे खरेदी करण्यासाठी लाखो रुपये देण्यास लोक तयार असतात. मात्र अशा जुन्या नोटा- नाणी खरेदी विक्रीच्या अमिषाला बळी पडू नका असे आवाहन आता भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)ने केलं आहे. यासंदर्भातील भारतीय रिझर्व्ह बँकेने एक नोटीस जाहीर केली आहे.

या नोटीसमध्ये RBI ने म्हटले की, जुन्या नोटा- नाणी खरेदी विक्रीसाठी काही ऑनलाईन वेबसाईट्स किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म भारतीय रिझर्व्ह बँकेचे नाव आणि लोगोचा वापरून नागरिकांकडून अवैध्यरित्या टॅक्स किंवा कमिशन वसुली करत आहेत.

- Advertisement -

मात्र अशा कोणत्याही प्रकारच्या व्यवहारांसाठी रिझर्व्ह बँक कमिशन किंवा टॅक्स घेत नाही. त्यामुळे अशा खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी कोणत्याही वेबसाईट, संस्था किंवा व्यक्तीला टॅक्स किंवा कमिशन गोळा करण्याचे अधिकार नाहीत. असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले.

- Advertisement -

त्यामुळे जुन्या नोटा – नाणी खरेदी विक्रीसाठी आणि बनावट ऑफर्ससाठी रिझर्व्ह बँकेच्या नावे होणाऱ्या पैसे वसुलीच्या अमिषाला नागरिकांनी बळू पडू नये असे आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेने केले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -