शिंदेंसोबत असलेल्या बंडखोर आमदारांना गुवाहाटीत हलवणार, तीन विमाने सुरत विमानतळावर दाखल

Rebel MLAs with Shinde will be shifted to Guwahati

एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या बंडखोर आमदारांना आसामच्या गुवाहाटी येथे हालवले जाणार आहे. यासाठी स्पाईसजेटची तीन विमाने सुरतविमान तळावर दाखल झाली आहेत. गुजरात महाराष्ट्राला लागून असल्याने हा निर्णय घेण्यात आलेल्याचे समजते आहे. सूरत येथील हॉटेलमधून आमदार विमानतळाकडे रवाना झाले आहेत.

शिवसेनेना नेते एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या बंडखोर आमदारांना सूरतमधील हॉटेलमध्ये आणण्यात आले होते. यातील अनेक आमदारांना आपण कुठे नेले जात आहे, याची माहिती रात्री नव्हती. त्यामुळे आता हे आमदार मुंबईत परततील, तसेच पळून जाण्याची भीती एकनाथ शिंदे यांना वाटत असल्याने आमदारांना थेट आसाममध्ये गुवाहाटीला नेण्यात येणार आहे. त्यासाठी तीन विमाने तीन विमाने सुरत विमान तळावर दाखल झाली आहेत.

३ ते ४ आमदार पालघर सीमेवरुन चिखलातून चालत आले – 

सूरतमधील शिसेनेच्या आमदारांपैकी काही जण एकनाथ शिंदेंच्या गटाचे आहेत. मात्र, काही आमदारांना रात्री वसईला बोलवण्यात आले. तिथून स्नेहभोजन आहे, असे सांगून सुरतला नेण्यात आल्याची माहिती आहे. यातील ३ ते ४ आमदार रात्री पालघर सीमेवरुन चिखलातून चालत पळून आल्याची माहिती आहे. अशा स्थितीत आणखी काही आमदारही सुरतमधून जातील अशी शक्यता  असल्यामुळे त्यांना आसाममध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

भाजप नेते हॉटेलमध्ये दाखल – 

ली मेरेटियन हॉटेलात भाजपाचे आमदार मोहित कम्बोज असल्याचे फोटो बाहेर आले आहेत. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. भापाचे आणखीही काही नेते आणि पदाधिकारी तिथे पोहचले आहेत. आता आसामामध्ये हे आमदार नेल्यानंतर, त्यांचा राज्याशी संपर्क होणे थोडे अवघड आहे.