Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Reliance उद्योग समूहाची Family Support Scheme ची घोषणा, कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास...

Reliance उद्योग समूहाची Family Support Scheme ची घोषणा, कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास कुटुंबियांना ५ वर्षांचा पगार

मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च देखील कंपनी उचलणार असल्याचे घोषित करण्यात आले

Related Story

- Advertisement -

कोरोना महामारीत अनेक घरातील कमावत्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रिलायन्स उद्योग समूहाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबियांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिलायन्सने जारी केलेल्या परिपत्रकात रिलायन्स उद्योग समूहात काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्या कुटुंबियांसाठी रिलायन्स फॅमिली सपोर्ट अँड वेलफेअर स्किमची (Family Support and Welfare Scheme)  घोषणा केली आहे. या स्किम अंतर्गत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना पाच वर्षांपर्यंत पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च देखील कंपनी उचलणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. (Reliance Industries announces Family Support Scheme, 5 years salary to families in case of corona death of employee)

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी जारी केलेल्या परिपत्रकारत असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरस हा आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात भीषण घटना आहे. कोरोना महामारीमुळे देशात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जण कोरोनाचा सामना करत आहेत. या काळात अनेकांचे मृत्यू झाले आहेत. त्यांची कुटुंबीय रस्त्यावर आलेत. अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या. अशा परिस्थितीत रिलायन्स इडस्ट्रीज आपल्या पूर्ण क्षमतेसह कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. कोरोना महामारीत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत करणार आहे.

रिलायन्स फॅमिली सपोर्ट स्किममधून मोलाची मदत

- Advertisement -

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबियांना पाच वर्षे पगार मिळणार. कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी कंपनी घेणार आहे. मुलांच्या शैक्षणिक शिक्षणादरम्यान कोणत्याही संस्थेत प्रवेश मिळाल्यास त्यांच्या शिक्षणाचा खर्च, राहण्याचा आणि पाठ्यपुस्तकाचा खर्च रिलायन्स इडस्ट्री करणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मुलांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत त्याच्या कुटुंबियातील व्यक्तीचा सर्व वैद्यकीय खर्च रिलायन्स इडस्ट्री करणार आहे.

सध्या कंपनीत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील कोणीही कोरोनाग्रस्त असेल तर ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ठिक होईपर्यंत कोविड रजा घेऊ शकतात. रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये जे कर्मचारी पे रोलवर नाहीत त्यांच्यापैकी कोणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना एकरकमी १० लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा – Corona Crisis: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ६२४ डॉक्टरांचा मृत्यू, IMAची माहिती

- Advertisement -