घरताज्या घडामोडीRepublic Day 2022: 75 वर्षांत पहिल्यांदा अर्धा तास उशिरा सुरू होणार...

Republic Day 2022: 75 वर्षांत पहिल्यांदा अर्धा तास उशिरा सुरू होणार प्रजासत्ताक दिनाची परेड, काय आहे कारण?

Subscribe

देशाच्या राष्ट्रीय राजधानीत दिल्लीत प्रजासत्ताक दिन साजारा करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी राजपथावरील सुरक्षा वाढवली आहे. जवळपास 300 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून लोकांचे चेहरे ओळखण्यासाठी वेगळी सिस्टम लावण्यात आली आहे.

26 जानेवारी 2022 रोजी भारत आपला 73व्या प्रजासत्ताक दिन ( Republic Day 2022)  साजरा करणार आहे. देशात दरवर्षी प्रजासत्ताक दिनादिवशी दिल्लीच्या राजपथपावर परेड आयोजित केली जाते. मात्र यंदा ही परेड तब्बल अर्धा तास उशिरा सुरू होणार आहे. देशाच्या 75 वर्षांत पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनाची परेड उशिरा सुरू होणार आहे. कोरोना प्रोटोकॉल आणि श्रद्धांजली सभेमुळे यंदाची प्रजासत्ताक दिनाची परेड उशिरा सुरू होणार आहे. प्रजासत्ताक दिना दिवशी पहिल्यांदा जम्मू- काश्मीरमध्ये शहीद झालेल्या सुरक्षा रक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य परेडला सुरुवात होईल.

प्रजासत्ताक दिनाची परेड 90 मिनिटांची असते. दर वर्षी 26 जानेवारीला सकाळी ठीक 10 वाजता राजपथावर परेडला सुरुवात होते. मात्र यंदा परेड 10:30 वाजता सुरु होणार आहे. ही परेड 8 किलोमीटर पर्यंत असणार आहे. परेड रायसीना हिल येथून सुरू होणार असून राजपथ, इंडिया गेट करुन लाल किल्ल्यावर संपणार आहे.

- Advertisement -

300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची असणार नजर

देशाच्या राष्ट्रीय राजधानीत दिल्लीत प्रजासत्ताक दिन साजारा करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी राजपथावरील सुरक्षा वाढवली आहे. जवळपास 300 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून लोकांचे चेहरे ओळखण्यासाठी वेगळी सिस्टम लावण्यात आली आहे. या सिस्टिममध्ये 50 हजार संदिग्ध आपराध्यांचे डेटाबेस आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजपथावर कार्यक्रम पाहण्यासाठी केवळ 4 हजार तिकीट्स उपलब्ध करण्यात आले आहेत. तर केवळ 24 हजार लोकांना कार्यक्रमात सहभाग घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त राजपथावर एकूण 75 विमानांचा ताफा मोठा आणि भव्य फ्लाईपास्ट करणार आहेत. वायुसेनेचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर इंद्रनील नंदी यांनी म्हटले आहे की, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय वायुसेना, लष्कर आणि नौदलाची एकूण 75 विमाने टेक ऑफ करणार आहेत. त्याचप्रमाणे आपली क्षमता दाखवणाऱ्या विमानात राफेल, भारतीय नौसेनेचे मिग29 के, पी-8 I विमान आणि जॅगवॉर लडाऊ विमानांचा समावेश होता.

- Advertisement -

26 जानेवारीला आतंकवादी हल्ल्याचा अलर्ट

यंदाच्या 26 जानेवारीच्या दिवशी देशात आतंकवादी हल्ल्याचा अलर्ट इंटेलिजेंस ब्यूरोने दिला आहे. इंटेलिजेंस ब्यूरोने दिल्ली पोलिसांना 9 पानांचा अलर्ट शेअर केला आहे. अलर्टमध्ये म्हटले आहे की, आईएसआईच्या इशाऱ्यावर खलिस्तान लिबरेशन फोर्स भारताच्या मोठ्या नेत्यांना टारगेट करण्याची योजना तयार करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खलिस्तान लिबरेशन फोर्सने इस्लामिक आंतकवाद्यांसोबत एक नवीन गठजोड बनवली आहे. अलर्टनुसार, आतंकवादी गर्दीच्या ठिकाणी तोडफोड करू शकतात किंवा हल्ला देखील करू शकतात. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी संसद भवन, लाल किल्लाच्या आसपासच्या परिसरात कडक बंदोबस्त लावला आहे.


हेही वाचा – पीएम मोदींच्या भाषणात अडथळा, टेलिप्रॉम्प्टरलाही खोटं सहन झालं नाही ; राहुल गांधींची मोदींवर टीका

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -