घरताज्या घडामोडीCovid-19: पर्वतावरील 'बुरांश' वनस्पती कोरोनावर करू शकते मात! IIT मंडीचे संशोधन

Covid-19: पर्वतावरील ‘बुरांश’ वनस्पती कोरोनावर करू शकते मात! IIT मंडीचे संशोधन

Subscribe

हिमालयाच्या भागात आढळलेल्या बुरांश वनस्पतीच्या पानात अँटीव्हायरल तत्त्व आढळली आहेत, जी कोरोना व्हायरस रोखतात असे समोर आले आहे.

देशात कोरोनासह ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढत आहे. यादरम्यान कोरोनावर मात करण्याबाबत काही संशोधन समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी भांग आणि गांजामधील काही संयुगे कोरोना रोखू शकतात असे समोर आले होते. आता हिमालयातील एक वनस्पतींच्या पानांमध्ये फायटोकेमिकल्स आढळले आहेत. या फायटोकेमिकल्सपासून कोरोनावर उपचार केले जाऊ शकतात, असे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (IIT), मंडी आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नोलॉजी संशोधनकर्त्यांना आढळले आहे.

संशोधनात असे आढळले आहे की, हिमालय भागात आढळलेली बुरांशी वनस्पतीमध्ये (Rhododendron arboreum) अँटीव्हायरल तत्व आढळले आहेत, जे व्हायरसोबत लढू शकतात. या संशोधनाचे परिणाम ‘Biomolecular Structure and Dynamics’ जर्नलमध्ये प्रकाशित केले आहे. या वनस्पतीची पानं गरम पाण्यात टाकल्यामुळे, याच्या अर्कामध्ये क्विनिक अॅसिड आणि याचे डेरिवेटिवचे प्रमाण खूप आढळले आहे. मॉलिक्यूलर डायनेमिक्सच्या अध्ययनात आढळले आहे की, हे फायटोकेमिकल्स व्हायरसवर दोन प्रकारे परिणाम करते.

- Advertisement -

वैज्ञानिकांनी सांगितले की, संशोधनात आढळले की, पानांच्या अर्कात नॉन टॉक्सिक डोस, वेरो E6 पेशींवर कोणताही विपरीत परिणाम न करता, पेशींमध्ये कोरोनाचा धोका कमी करतो. आरोग्याच्या दृष्टीकोनातून हिमालयातील बुरांश वनस्पतींच्या पानांचा स्थानिक लोकं अनेक प्रकारे वापर करतात.

आयआयटी मंडी स्कूल ऑफ बेसिक सायन्सचे असोसिएट प्रोफेसर श्याम कुमार मसकापल्ली म्हणाले की, लसीकरण करून शरीरात व्हायरससोबत लढण्यासाठी शक्ती दिली जात आहे. यादरम्यान जगभरात लस नसलेल्या औषधांचा शोध सुरू आहे, ज्यामुळे मानवी शरीरात व्हायरस हल्ला रोखू शकतो. या औषधात केमिकलचा वापर केला जातो, जे एकतर आपल्या शरीरातील पेशींमध्ये असलेल्या रिसेप्टर्ससोबत जोडले जातात आणि व्हायरसला त्यांच्यात प्रवेश करण्यापासून रोखतात किंवा ते व्हायरसवरच काम करतात. दरम्यान वेगवेगळ्या प्रकारे वैज्ञानिकांनी अध्ययन केले आहे. ज्यामध्ये फायटोकेमिकल्स (वनस्पतीमध्ये मिळालेले रसायन) फायदेशीर असल्याचे म्हटले जात आहे. आम्ही हिमालयातील वनस्पतींमधून उपयुक्त रेणू शोधत आहोत. संशोधन करणाऱ्या टीमने कोरोनावर बुरांशच्या पानांमध्ये आढळलेले फायटोकेमिकल्सचा परिणाम समजून घेण्यासाठी आणि शोध करण्यासाठी योजना बनवली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: कोरोनावर मात करण्याचे हत्यार मिळाले भांग, गांज्यात?; पण वैज्ञानिक म्हणाले…


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -