घरदेश-विदेशघरी गेल्यावर ऑफिसचे फोन येतात? मग हे वाचाच

घरी गेल्यावर ऑफिसचे फोन येतात? मग हे वाचाच

Subscribe

कामावरून घरी गेल्यानंतर आता कंपनीच्या कामाला नकार देता येणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'राईट टू डिसकनेक्ट' हे विधेयक लोकसभेत मांडलं आहे.

अरे या बॉसनं जगणं नकोसं करून ठेवलं आहे. कामाची कटकट दिवसेंदिवस वाढते. घरी गेल्यावर देखील ही बॉस लोकं जगणं नकोसं करून ठेवतात. नोकरीवर लाथ मारावी असं वाटतं? पण….अशा एक ना अनेक प्रकारे बहुतेक जण आपल्या कामावरची व्यथा मांडतात. कामावरून घरी गेल्यानंतर किंवा शिफ्ट संपल्यानंतर ऑफिसचे फोन्स, मेल्स पाहावे लागतात. त्याला उत्तर द्यावे लागते. त्यामुळे या बॉस लोकांना आवरा अशी प्रतिक्रिया अनेक जण देताना दिसतात. काही जण तर बॉसला, कंपनीला शिव्यांची लाखोली देखील वाहतात. पण, या कटकटीपासून तुमची सुटका झाली तर? मन मे लड्डू फुटे ना? कदाचित हा दिवस लवकरच उजाडण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत शुक्रवारी ‘राईट टू डिसकनेक्ट’ खासगी विधेयक माडलं. पण, त्यावर चर्चा मात्र झाली नाही. पण, चर्चा झाल्यानंतर विधेयक पारित झाल्यास कर्मचाऱ्यांना घरी गेल्यानंतर कंपनीच्या कामाला नकार देता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -