घरदेश-विदेश'या' बेटाला मिळणार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव

‘या’ बेटाला मिळणार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव

Subscribe

३० डिसेंबर १९४३ रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअरला तिरंगा फडकावला होता. त्या घटनेला येत्या ३० तारखेला ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत.

मोदी सरकारने लोकप्रिय बेटांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या बेटाचे नाव नेताजी सुभाषचंद्र बोस करण्यात येणार आहे. अंदमान आणि निकोबार बेटांच्या समूहातील हे बेट असू  ‘रॉस’ बेटाला नेताजी सुभाषचंद्र बोस हे नाव दिले जाणार आहे.शिवाय अन्य बेटांची नामांतरे देखील करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. येत्या ३० डिसेंबरचे औचित्य साधून हे नामकरण करण्यात येणार आहे, असे देखील सुत्रांनी सांगितले आहे.

भयानक! इराणी तरुणीला सिगरेटचे चटके, आरोपी अटकेत

म्हणून देणार नेतांजींचे नाव

३० डिसेंबर १९४३ रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअरला तिरंगा फडकावला होता. त्या घटनेला येत्या ३० तारखेला ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. या घटनेच्या स्मरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी अंदमानात तिरंगा फडकावणार आहेत. यावेळी त्यांच्या उपस्थितीत रॉस बेटाला नेताजी सुभाषचंद्र बोस नाव देण्यात येणार आहे. तर नील आणि हॅवलॉक या बेटाला अनुक्रमे शहीद आणि स्वराज अशी नवे दिली जाणार आहेत.

- Advertisement -
20 Rupees, नवी नोट लवकरच येणार – आरबीआय

राज्यसभेत केली होती मागणी

भाजप नेते एल. ए, गणेशन यांनी मार्च २०१७ रोजी राज्यसभेत हॅवलॉक बेटाचे नामांतरण करा, अशी मागणी केली होती. या बेटाचे नाव ब्रिटिश जनरल हेन्री हॅवलॉक याच्या नावावरुन ठेवण्यात आले होते. केंद्रशासित प्रदेशातील हे सगळ्यात मोठे बेट आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -