घरमुंबई'सांताक्लॉज'ने दिला स्वच्छतेचा संदेश

‘सांताक्लॉज’ने दिला स्वच्छतेचा संदेश

Subscribe

ख्रिसमस अर्थात नाताळ आज जगभरात साजरा करण्यात आला आहे. बऱ्याच ठिकाणी सांताने अनेकांना गिफ्ट देऊ केले आहेत. मात्र घाटकोपरमध्ये काही सांताने स्वच्छतेचा संदेश देत नाताळ साजरा केला आहे. हा सांता ३१ डिसेंबर पर्यंत घाटकोपर आणि विक्रोळी परिसरात स्वच्छतेचा संदेश देत आहे.

जिंगल बेल, जिंगल बेल; जिंगल ऑल दि वे’ या गाण्यासह मंजूळ घंटानाद करत, बच्चे कंपनीला ‘गिफ्ट्स’ देत आनंद देणाऱ्या आणि सर्वानाचा हवाहवासा वाटणारा सांताक्लॉजने चक्क स्वच्छतेचा संदेश दिला आहे. स्वच्छतेचा संदेश देत हा ‘सांताक्लॉज’ने सध्या घाटकोपर परिसरात फिरत आहे. हा सांताक्लॉज जनतेशी संवाद साधत घाटकोपरमध्ये फिरत असल्याने हा सांता कुतूहलाचा विषय ठरत आहे.

सांताने दिला स्वच्छतेचा संदेश

महापालिकेच्या ‘एन’ विभागाच्या विनंतीनुसार अवतरलेला आपला लाडका सांताक्लॉज नेहमीपेक्षा थोडा वेगळा संदेश घेऊन मुंबईकरांशी संवाद साधत आहे. मुंबईच्या स्वच्छतेचा आणि साफसफाईचा! संदेश हा सांता देत आहे. घाटकोपर आणि विक्रोळी परिसरात रोज सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या ठिकाणी हा सांताक्लॉज दिसत आहे. या सांताक्लॉजला भेटण्यासाठी बच्चे कंपनीमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान महापालिकेच्या ‘एन’ विभागातील गर्दीच्या ठिकाणी हा सांताक्लॉज आपल्याला भेटणार आहेत.

- Advertisement -

सांताकडून ‘ग्रीटींग कार्ड’ची भेट

स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन इत्यादी विषयांशी संबंधित वेगवेगळे संदेश सांताक्लॉजमार्फत शालेय विद्यार्थ्यांना आणि परिसरातील नागरिकांना दिले जात आहेत. एवढेच नाही तर लहान मुलांना सांताक्लॉज स्वतःच्या हाताने ‘गिफ्ट’ देखील देत आहे. त्याचबरोबर जे नागरिक रस्त्यावर किंवा पदपथावर कचरा फेकतील त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून सांगण्यासोबतच स्वच्छतेचा संदेश असलेले एक छोटेसे ‘ग्रीटींग कार्ड’ देखील सांताक्लॉजच्या हातूनच ‘गिफ्ट’ स्वरुपात मिळत आहेत. स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या सांताक्लॉजला भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी लहानांसोबतच मोठ्यांचीही गर्दी दिसून येत आहे.

महापालिकेच्या ‘एन’ विभागाने सांताक्लॉजच्या सहकार्याने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेतली आहे. त्याप्रमाणे स्वच्छतेबाबत जाणीव जागृतीसाठी महापालिकेच्या इतर विभाग कार्यालयांनी देखील या प्रकारचा अभिनव उपक्रम आपापल्या क्षेत्रात राबवावा.  – अजोय मेहता, महापालिका आयुक्त

- Advertisement -

२५ डिसेंबर रोजीच्या ‘नाताळ’ सणाचे आणि पुढील आठवड्यात येणाऱ्या नवीन वर्षाचे औचित्य लक्षात घेऊन स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणाबाबत सांताक्लॉजच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा अभिनव प्रयोग राबविला आहे. महापालिकेचे कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक यांच्या मदतीने एन विभागातील महत्त्वाच्या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला मोठ्यांचा आणि लहानांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे.  – भाग्यश्री कापसे,सहाय्यक आयुक्त – ‘एन’ विभाग


वाचा – ठाण्यातील हॉटेल्स, इमारतींमध्ये ख्रिसमस पार्ट्या

वाचा – जॅकलीनने असा साजरा केला ख्रिसमस, पाहा फोटो


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -