घरदेश-विदेशराष्ट्रपती पुतीन यांचा उजवा हात असलेल्या डूगिन यांच्या मुलीचा कारबॉम्ब स्फोटात मृत्यू

राष्ट्रपती पुतीन यांचा उजवा हात असलेल्या डूगिन यांच्या मुलीचा कारबॉम्ब स्फोटात मृत्यू

Subscribe

रशियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, लँड क्रूझर प्राडो कारमध्ये मोठा स्फोट झाला, त्यानंतर आजूबाजूला आगीचे उठू लागल्या

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना मोठा धक्का देण्यात आला आहे. पुतीन यांचे राईट हँड आणि युक्रेन युद्धाचे मास्टरमाइंड अलेक्झांडर डूगिन यांची मुलगी डारिया डूगिन हिची हत्या करण्यात आली आहे. डारिया डूगिन तिच्या लँड क्रुझर कारने घरी जात होती. यावेळी अचानक कारमध्ये बॉम्बस्फोट होऊन जागीच मृत्यू झाला. ओडिंत्सोव्हस्की जिल्ह्यातील मोझायस्कोये हायवेवर हा भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अलेक्झांडर डूगिनबद्दल असे म्हटले जाते की, क्रिमिया आणि युक्रेन युद्धामागे त्याचा हात होता. तसेत पुतीनचा मेंदू म्हणून देखील त्यांना संबोधले जाते.

युक्रेनमधील दहशतवाद्यांनी हा कारबॉम्ब स्फोट घडवून आणल्याचा दावा डोनेस्क रिजनचे कमांडर डेनिस पुशलिन यांनी केला आहे. युक्रेनच्या राष्ट्रपतींनी दोन दिवसांपूर्वी रशियाला जेपोरिजिया प्लांट खाली करण्यासाठी धमकी दिली होती. हा प्लांट खाली न केल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता. यानंतर ही घडल्याने खळबळ उडाली.

- Advertisement -

रशियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, लँड क्रूझर प्राडो कारमध्ये मोठा स्फोट झाला, त्यानंतर आजूबाजूला आगीचे उठू लागल्या. कारमध्ये झालेल्या स्फोटानंतर आजूबाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. घटनास्थळी गोंधळ उडाला. स्फोटानंतर गाडीचे तुकडे इकडे तिकडे विखुरले होते. गाडीतून ज्वाळा उठत होत्या. महामार्गावर हा स्फोट झाल्याने तेथील वाहतूक थांबवण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षी जुलैमध्ये ब्रिटनने रशियाच्या लोकांवर लादलेल्या निर्बंधांमध्ये डारिया डूगिनचा समावेश करण्यात आला होता. 60 वर्षीय अलेक्झांडर डूगिनची मुलगी डारिया एक लेखक होती. वडिलांची एक मार्गदर्शन म्हणून ओळखली जायची. रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा डारिया डूगिननेही या हल्ल्याला पाठिंबा दिला होता.

- Advertisement -

2015 मध्ये रशिया-युक्रेन युद्धापूर्वी अमेरिकेने अलेक्झांडर डूगिनला व्यापार संबंध तोडण्यास आणि त्याची मालमत्ता गोठविण्यास बंदी घातली. अलेक्झांडर डूगिन एक प्रख्यात अति राष्ट्रवादी विचारवंत आहेत जे रशियन अध्यक्षांच्या जवळचे मानले जातात. आतापर्यंत या स्फोटाबाबत रशियन अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.


हिमाचल प्रदेशमध्ये पुराचा कहर, ठिकठिकाणी भूस्खलन, आत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -