घरदेश-विदेशसपना चौधरी काँग्रेसमध्ये जाणार ही फक्त अफवा, सपनाने दिले स्पष्टीकरण

सपना चौधरी काँग्रेसमध्ये जाणार ही फक्त अफवा, सपनाने दिले स्पष्टीकरण

Subscribe

सिंगर-डान्सर सपना चौधरीने काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची बातमी प्रसार माध्यमांमध्ये फिरत होती. मात्र अखेर सपनाने पत्रकार परिषद घेऊन या बातम्यांचे खंडन केले आहे.

हरियाणी डान्सर सपना चौधरी हिने काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची अफवा पसरवण्यात आली होती. सपनाचा एक जुना फोटो शोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो अभिनेते राज बब्बर यांनी सोशल मीडियावर टाकला होता. यामुळे सपना काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याची चर्चा होती. सपनाला भाजप खासदार आणि जेष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी विरोधात निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र सपना चौधरीने या सर्व बातम्याचे खंडन केले आहे. आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसल्याचे तिने नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो हे जुने असल्याचे तिने यावेळी सांगितले. सोशल मीडियावर पसरलेल्या बातम्यांचा विश्वास करू नका असेही ती यावेळी म्हणाली.

- Advertisement -

प्रियंका गांधींशी घेतली भेट

सपनाने शनिवारी उशीरा रात्री काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याची अफवा पसरल्या नंतर तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सपना प्रियंका गांधी वडेरा यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली होती. प्रियंका गांधीं सोबत तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामुळे सर्वांना वाटले की सपनाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.Sapna-priynaka

सपना काँग्रेसमध्ये असल्याचे पुरावे

आपण काँग्रेसमध्ये नसल्याचे सपनाने सांगितले असले तरीही सपनाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचे पुरावे काँग्रेसच्या नेत्यांनी दाखवले आहे. त्यामुळे कोण खरे कोण खोटे बोलत आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -