नशीब बलवत्तर, 151 प्रवाशी बचावले

एअरबस ए330 ( फोटो सौजन्य - हिंदुस्थान टाईम्स )

आपुले मरण पाहिले म्या डोळा! याचि प्रचिती आली ती सौदी अरेबियातल्या १५१ विमानप्रवाशांना! सौदी अरेबियन एअरलाईन्सचे एअरबस ए३३० हे विमान १५१ प्रवाशांना घेऊन मदीनावरून ढाकाला निघाले होते. पण, तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे जेदाहच्या विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. लँडिंग वेळी विमान पेट घेत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

एमर्जन्सी लँडिंगवेळी वेळी विमानाने पेट घेतला. दरम्यान प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. यानंतर झालेल्या गोंधळात जवळपास ५३ प्रवाशी जखमी झाले. यामध्ये एका महिला प्रवाशाच्या हाताला फ्रॅक्चर झाले. या घटनेनंतर एआयबीने चौकशी सुरू केली आहे. पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा सौदी अरेबियात मोठा अपघात होता होता टळला आहे. अशा प्रकारचा अपघात जानेवारी २०१४ मध्ये देखील झाला होता. यामध्ये २९ प्रवाशी जखमी झाले होते.


क्युबा एअरलाईन्स विमानाला अपघात

क्युबा एअरलाईन्सला झालेल्या अपघातात ११० प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. जेहाद विमानतळावर झालेल्या घटनेने सर्वांच्या अंगाचा थरकाप उडाला. विमानांची हवेतच टक्कर टळणे, विमान भरकटणे, ट्रॉफिक कंट्रोलशी संपर्क तुटणे सारख्या या वारंवार घडत असतात. त्यामुळे विमानकंपन्यांसह सरकारने देखील खबरदारी घेणे गरजेचे आहे.