घरताज्या घडामोडीSBI Apprentice Recuitment 2021: ६ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, जाणून घ्या सविस्तर...

SBI Apprentice Recuitment 2021: ६ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, जाणून घ्या सविस्तर माहिती

Subscribe

महाराष्ट्रात ३७५ पदे भरण्यात येणार

बँकेत जॉब मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी SBIने मोठी संधी दिली आहे. SBI ने अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरु केली आहे. याअंर्तगत SBI तब्बल ६१०० रिक्त पदे भरणार आहे. ज्यात महाराष्ट्रात ३७५ पदे भरण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी SBI च्या sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरायचा आहे.  SBIच्या अप्रेंटिस पदांसाठी अर्ज भरण्याची वेळ आजपासून सुरु होत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्यासाठी ही महत्त्वाची संधी आहे. SBIच्या अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करण्यासाठी अधिक माहिती जाणून घ्या. (SBI Apprentice Recruitment 2021: Recruitment for more than 6,000 posts, know the details)

अर्ज करण्याची तारीख

६ जुलै २०२१ ते २६ जुलै २०२१

- Advertisement -

या राज्यात होणार भरती

SBI अप्रेंटिस पदांसाठी संपूर्ण भारतातील उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. प्रत्येत राज्यासाठी भरती करण्यात येणाऱ्या पदांची संख्या निश्चित करण्यात असून ती पुढीलप्रमाणे.

  • गुजरात – ८०० पदे
  • आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर – १०० पदे
  • कर्नाटक, हिमाचल प्रदेश – २०० पदे
  • मध्यप्रदेश, छत्तीसगड,केरळ – ७५ पदे
  • लड्डाख, पद्दुचेरी,अंदमान निकोबार – १० पदे
  • पंजाब – ३५६ पदे
  • उत्तर प्रदेश – ८७५ पदे
  • पश्चिम बंगाल – ७१५
  • सिक्किम, उटी चंदीगड, झारखंड – २५ पदे
  • उडिसा – ४०० पदे
  • आसाम – २५० पदे
  • मेघालय, बिहार- ५० पदे
  • तेलंगणा, उत्तराखंड – १२५
  • राजस्थान – ६५०

तर मिझोराम, नालालँड,त्रिपुरा,अरुणाचल प्रदेश,मणिपुर या राज्यात प्रत्येकी २० पदांची भरती करण्यात येणार आहे.

- Advertisement -

अर्ज शुल्क

अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करताना जनरल, ओबीसी, आणि ईडब्ल्यू वर्गाचील उमेदवारांना ३०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर SC, ST आणि PH वर्गातील उमेदवारांना मोफत अर्ज करता येणार आहे. अर्ज शुल्क भरण्यासाठी क्रेडिट,डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा उपयोग करता येणार आहे.

शैक्षिणक पात्रता  

SBIच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदावराकडे मान्यता प्राप्त युनिव्हरसिटीची ग्रॅज्युएट डिग्री असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

SBIच्या अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० वर्ष ते २८ वर्ष असणे गरजेचे आहे. आरक्षणात येणाऱ्या उमेदवारांना नियमांनुसार वयात सूट दिली जाणार आहे.

वेतन

SBI कडून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहिना १५ हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे.


हेही वाचा – Covid vaccine आणि Test Report आता मोबाईलमध्येच होईल सेव्ह, गुगलचं नवं फिचर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -