घरदेश-विदेशगुजरात दंगल : पंतप्रधान मोदींबाबत सोमवारी सुनावणी

गुजरात दंगल : पंतप्रधान मोदींबाबत सोमवारी सुनावणी

Subscribe

गुजरात दंगल प्रकरणामध्ये नरेंद्र मोदींनी क्लिन चीट देण्यात आली होती. त्याला आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं आहे.

२००२ साली गुजरातमधील दंगलीसंदर्भात सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा देखील समावेश असून मोदींना दिलेल्या क्लिन चिटवर सोमवारी सुनावणी होणार आहे. २००२ साली गुजरातमध्ये दंगल झाली त्यावेळी नरेंद्र मोदी मुख्यमंत्रीपदी होते. दरम्यान मोदींना दिलेल्या क्लिन चीटला झाकीया जाफ्री यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. झाकीया या काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफ्री यांच्या पत्नी आहेत. २००२ साली झालेल्या दंगलीमध्ये एहसान जाफ्री यांना देखील आपला जीव गमवावा लागला होता. ऑक्टोबर २०१७ साली गुजरात उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ५८ जणांना क्लिन चीट दिली. स्पेशल इन्वेस्टिगेशन टिमनं दिलेल्या अहवालावरून ही क्लिन चीट देण्यात आली होती. त्याविरोधात आता झाकीया जाफ्री आणि तिस्ता सेटलवाड यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं आहे.

काय आहे प्रकरण

२००२ साली गुजरातमध्ये झालेल्या दंगलीमध्ये गुलबर्ग सोसायटी येथे हल्ला करण्यात आला. या सोसायटीमध्ये मुस्लिम कुटुंब राहत होती. ज्यामध्ये काँग्रेसचे खासदार एहसान जाफ्रींसह ६८ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. गोध्रा येथे ट्रेनचा डब्बा जाळल्यानं कारसेवकांच्या झालेल्या मृत्यूनंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदु – मुस्लिमांमध्ये दंगल झाली. त्यामध्ये शेकडो लोकांना आपला जीव गमवावा  लागला होता. दरम्यान, त्यानंतर २००६ साली झारीया जाफ्री यांनी नरेंद्र मोदी, काही मंत्री आणि अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दोन वर्षानंतर उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा नव्यानं चौकशीचे आदेश दिले. त्यामध्ये ९ दंगलींसह गुलबर्ग सोसायटी प्रकरणाचा देखील समावेश होता. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी क्लिन चिट देण्यात आली होती. दरम्यान उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आता झाकीया जाफ्री यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं आहे. ज्यावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -