घरदेश-विदेशभुवनेश्वरमध्ये वीजेच्या धक्क्याने ७ हत्तींचा मृत्यू

भुवनेश्वरमध्ये वीजेच्या धक्क्याने ७ हत्तींचा मृत्यू

Subscribe

ओडीशामधील ढेंकनाल जिल्ह्यातील कमालंगा गावाजवळ वीजेचा धक्का लागून ७ हत्तींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

ओडीशामधील ढेंकनाल जिल्ह्यातील कमालंगा गावाजवळ वीजेचा धक्का लागून ७ हत्तींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शुक्रवारी, २६ ऑक्टोबर रोजी रात्री ही दुर्घटना घडली. उच्च दाबाच्या वीजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने या हत्तींचा मृत्यू झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. शुक्रवारी १३ हत्तींचा कळप कमालंगा गावाच्या परिसरात फिरत होता. त्यातील ७ हत्तींचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून सुदैवाने ६ हत्ती यातून बचावले आहेत. रेल्वेच्या कामासाठी येथे उच्च दाबाच्या वीजेच्या तारा टाकल्या होत्या. मात्र वीजेच्या तारा जमीनीपासून १५ फूट उंचीवर असणे अपेक्षित असताना, त्या जेमतेम ८ फुटापर्यंतच होत्या. त्यामुळे हत्ती तारांच्या संपर्कात येऊन ही दुर्घटना घडल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी हत्तींचे मृतदेह ताब्यात घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -