घरदेश-विदेशधक्कादायक: जगभरात सर्वाधिक वायूप्रदूषण भारतात; दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांत हवेचा दर्जा घसरला

धक्कादायक: जगभरात सर्वाधिक वायूप्रदूषण भारतात; दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांत हवेचा दर्जा घसरला

Subscribe

Air Pollution in India: एनसीआर आणि नोएडामध्ये हवेची पातळी घसरल्याने शाळा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. तर, दिल्लीतही हवेची पातळी वाईट झाल्याने शाळा बंद ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. दिल्लीत, उद्या ५ नोव्हेंबरपासून शाळा बंद असणार आहेत. दिल्लीतील आयक्यू नियंत्रणात येण्यासाठी काही दिवस लागू शकतात. त्यामुळे शाळा केव्हा चालू होतील याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील हवा प्रदूषित (Air Pollution in India) होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दिवाळीनंतर दिल्लीत प्रदूषण (Air Pollution in Delhi) वाढल्याचाही अहवाल आला होता. आता धक्कादायक बातमी अशी की संपूर्ण जगात भारतातील हवा अधिक प्रदूषित आहे. त्यातही उत्तर भारतात (North India) हवेची पातळी म्हणजेच एअर क्वालिटी (Air Quality – IQ) ५०० पर्यंत पोहोचली आहे. एअर क्वालिटीचा (IQ) स्तर धोकादायकपेक्षाही जास्त असल्याने पर्यावरणवाद्यांकडून चिंता व्यक्त केली जातेय.

हेही वाचा – महाराष्ट्रात थंडीची चाहुल तर दक्षिण भारतात पावसाळी वातावरण; हवामान खात्याची माहिती

- Advertisement -

हवेची वाईट गुणवत्ता असलेल्या देशात भारत जगात टॉपला आहे. भारतात सरासरी आयक्यू ५०० च्या वर आहे. सर्वात प्रदूषित टॉप शहरांत भारतातील चार शहरांचा समावेश आहे. या शहारंत आयक्यु (IQ) हानिकारक स्तरावर आहे. दिल्लीतील वेगवेगळ्या भागात आयक्यू (IQ) ५०० ते ७०० दाखवण्यात आला आहे. तर, नोएडामध्ये ५१९, फरीदाबाद ५१५१ आणि गझियाबाद येथे ४९३ आयक्यू आहे.

हेही वाचा दिवाळीच्या उत्साहात सुरक्षेकडे दुर्लक्ष, मुंबईत फटाक्यांमुळे सहा दिवसांत आगीच्या 64 घटना

- Advertisement -

जगभरात कोण कितव्या क्रमांकावर

  • चीन दुसऱ्या क्रमांकावर – सर्वाधिक वाईट हवा असलेल्या देशात चीनचा दुसरा क्रमांक लागतो. बाओडिंगमध्ये आयक्यू ५०० आहे. मात्र, हे शहर सोडल्यास कोणत्याच शहारंत २०० पेक्षा जास्त आयक्यू निर्देशित केलेला नाही.
  • शेजारील देश चौथ्या क्रमाकांवर –  भारताचा शेजारील देश बांग्लादेशमध्ये १७० आयक्यु आहे. हा देश सर्वाधिक प्रुदषित हवा असलेल्या देशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. ढाका आणि पलटन या शहरांत फक्त हवा वाईट आहे. याव्यतिरिक्त इतर शहरांत हवेची पातळी चांगली आहे.

देशातील ही शहरं टॉप टेन यादीत

सर्वांत वाईट हवा असलेल्या टॉप टेन शहरांत दिल्ली एनसीआर, बिहारचा कटिहार शहर यांचाही समावेश आहे. येथे ३५० आणि ४४८ अनुक्रमे आयक्यू आहे. तसंच, मध्य प्रदेशच्या भोपाळ शहरात ४६८ आयक्यू, हरियाणाच्या सिरसा शहरात ४१२ आयक्यू नोंदवण्यात आला आहे.

दिल्लीत शाळा बंद

एनसीआर आणि नोएडामध्ये हवेची पातळी घसरल्याने शाळा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. तर, दिल्लीतही हवेची पातळी वाईट झाल्याने शाळा बंद ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. दिल्लीत, उद्या ५ नोव्हेंबरपासून शाळा बंद असणार आहेत. दिल्लीतील आयक्यू नियंत्रणात येण्यासाठी काही दिवस लागू शकतात. त्यामुळे शाळा केव्हा चालू होतील याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

मुंबईची हवाही बिघडली

देशभरात हवेची पातळी बिघडत असताना मुंबईतही हवेची पातळी घसरत आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, माझगाव, चकाला आदीठिकाणी हवेची पातळी २०० ते २५० आयक्यू दर्शवत आहे. तर, छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ येथे हवेची पातळी समाधानकारक आहे. तर, देवनार, विलेपार्ले, कुलाबा, पवई, नेवी नगर, मुलुंड येथेही १०० ते २०० च्या घरात आयक्यूची नोंद झाली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -