डुकरांची निघाली शूटआऊट ऑर्डर, ‘या’ राज्याचा अजब निर्णय

shootout of pigs planned by madhya pradesh shivpuri nagarpalika
डुकरांची निघाली शूटआऊट ऑर्डर, 'या' राज्याचा अजब निर्णय

मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रात वाढत्या डुकरांची संख्या अडचणीचे कारण बनत आहे. त्यामुळे शहरातील विविध भागात निर्माण झालेल्या डुकरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेतली आहे. या डुकरांना मारण्यासाठी ‘शूटआऊटचा’ अजब प्लॅन तयार केला आहे. डुकरांना शूटआऊट करण्यासाठी नेमबाजांकडून निविदा देखील मागविण्यात आल्या आहेत.

या शहरातील विविध भागात डुक्कर खूप मोठ्या संख्येने आहेत. माहितीनुसार या ठिकाणी आता १० हजाराहून अधिक डुकर असल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व डुकर पाळणाऱ्या लोकांची बैठक घेऊन हे डुकर शहराबाहेर काढण्याचे निर्देश दिले आहेत. जर त्यांनी बाहेर काढले नाहीतर तर डुकरांना मारले जाईल असे सांगण्यात आले आहे. मुख्य पालिका अधिकारी के.के. पटेरिया म्हणाले की, डुकरांना मारण्यासाठी नगर पालिकेने नेमबाजांकडून निविदा मागवल्या आहेत. १८ ऑगस्ट ही शेवटी तारीख असले.

मागील वर्षात शिवपुरी शहरातील ग्वाल्हेर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणी देत पालिका अधिकाऱ्यांना डुकरांना मारण्याचे निर्देश दिले गेले होते. त्यानंतर पालिकेने शिवपुरी शहरातील डुकरांना मारण्यासाठी नेमबाजांना बोलावले होते. यावेळेस त्यांनी २० हजारांहून अधिक डुकरांना ठार मारले होते.


हेही वाचा – कोरोना व्हायरसचे मुळ शोधण्यासाठी शास्त्रज्ञांचा वटवाघुळांच्या गुहेत प्रवेश