घरदेश-विदेश18 लाख दिव्यांनी उजळली श्रीरामांची अयोध्या नगरी, मोदींच्या हस्ते दीपप्रज्वलन

18 लाख दिव्यांनी उजळली श्रीरामांची अयोध्या नगरी, मोदींच्या हस्ते दीपप्रज्वलन

Subscribe

दिवाळी सणात सहभागी होण्यासाठी अयोध्येच्या बाहेरून लाखो लोक अयोध्येत आले आहेत. यावर्षी अयोध्येत सुमारे 18 लाख मातीचे दिवे प्रज्वलित करण्यात आले.  

प्रभू श्री राम यांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्या नगरीला दिवाळीत मोठ्या प्रमाणावर सजवण्यात आले आहे. शहरात ठिकठिकाणी रामायण आणि रामचरित मानस मधील लोकप्रिय स्तोत्रे आणि दोहे यांचे गायन वाचन केले जात आहे. दिवाळी सणात सहभागी होण्यासाठी अयोध्येच्या बाहेरून लाखो लोक अयोध्येत आले आहेत. यावर्षी अयोध्येत सुमारे 18 लाख मातीचे दिवे प्रज्वलित करण्यात आले.

pm narendra modi

- Advertisement -

दीपोत्सवात दिवे सजवण्यासाठी लोक पहाटेपासूनच राम की पौडी जवळ जमू लागले आणि दरम्यान राम की पौडी जबल आलेल्या लोकांची सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून तपस देखील करण्यात आला. लता मंगेशकर चौकाजवळील टॉवरमधील दोन पोलीस राम की पौडी परिसरातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून होते. हनुमानगढी ते राम की पौडीजवळ जाणाऱ्या रस्त्यावर बॅरीगेटरसुद्धा लावण्यात आले होते.

- Advertisement -

हा भव्य दीपोत्सव अयोध्येतील दिवाळीच्या उत्सवाचा एक भाग म्हणून आज येथे भव्य दीपोत्सव साजरा केला गेला, या दीपोत्सवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले होते. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोदींचे स्वागत आणि सत्कार केला. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी रविवारी सकाळी ट्विट केले की, ‘प्रभू श्री राम आणि सीता माता यांचे पवित्र निवासस्थान असलेल्या श्री अयोध्याजीमध्ये आयोजित भारताची अस्मिता आणि सनातन श्रद्धेच्या मूल्यांचे प्राचीन वैभव सातत्याने पुनर्संचयित करणाऱ्या येत आहे. त्याचबरोबर ‘या भव्य-दिव्य दीपोत्सव-2022 मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे’. असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

रविवारी संध्याकाळी ‘दीपोत्सव’ कार्यक्रमात मोदी सहभागी झाले. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी लाल गालिचा अंथरण्यात आला होता. रामजन्मभूमी मंदिरात राम लल्लाचे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील लेझर शो सुद्धा पहिला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधानांना रामजन्मभूमीवर निर्माणाधीन राम मंदिराचे काम दाखविले. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी संपूर्ण अयोध्येत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

राम की पौडी आणि इतर ३७ घाटांवर सुमारे १५ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. दीपोत्सवात या घाटांवर १५ लाख दिव्यांची रोषणाई करून नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न अयोध्या प्रशासना कडून करण्यात आला. शहरातील महत्त्वाच्या चौकांवर आणखी तीन लाख दिवे प्रज्वलीत करण्यात आले होते.

अयोध्या प्रशासनाने मागील वर्षी दीपोत्सवात ९,४१,५५१ दिवे लावून विश्वविक्रम केला होता. मात्र महाशिवरात्रीला उज्जैनमधील शिप्राच्या काठावर 11,71,78 दिवे लावून हा विक्रम मोडला मोडण्यात आला होता. विशेष म्हणजे शरयू आरतीलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. रविवारी राम की पौडी घाटावर पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या समोर रामायणातील अनेक दृश्यांचा लेझर शो सुद्धा दाखविण्यात आला.


हे ही वाचा – इव्हेंटबाजी नको रोजगार द्या, काँग्रेसची ‘रोजगार मेळ्या’वर जोरदार टीका

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -