घरताज्या घडामोडीवैज्ञानिकांनी तयार केले कोरोना टेस्टिंगचे नवे तंत्र, अवघ्या ३६ मिनिटांत रिपोर्ट येणार

वैज्ञानिकांनी तयार केले कोरोना टेस्टिंगचे नवे तंत्र, अवघ्या ३६ मिनिटांत रिपोर्ट येणार

Subscribe

वैज्ञानिकांनी जे नवीन तंत्र विकसित केले आहे त्याचे नाव पोलीमरेज चेन Reaction म्हणजेच पीसीआर आहे.

कोरोनाच्या चाचण्या कमी होत असल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच हे मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे. अशा परिस्थितीत सिंगापूर मधील तज्ज्ञांनी आणि वैज्ञानिकांनी असे तंत्र विकसित केले आहे, यामुळे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही? हे चाचणी केल्यानंतर अवघ्या ३६ मिनिटांत कळू शकते.

सध्या ज्या प्रकारे कोरोना चाचण्या होते आहेत. त्याचे अहवाल येण्यास बरेच तास लागतात आणि तोपर्यंत पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात अनेक लोक येतात आणि त्यांना कोरोनाची लागण होते. तसेच सध्या कोरोना चाचणी तंत्रात योग्य परिणामांसाठी उच्च प्रशिक्षित तांत्रिक कर्मचारी देखील आवश्यक आहेत. या सर्व समस्या लक्षात घेऊन सिंगापूरच्या तज्ज्ञांनी असे तंत्र विकसित केले आहे, ज्यामुळे अवघ्या ३६ मिनिटांत व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला आहे की नाही हे कळू शकते.

- Advertisement -

सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (NTC)च्या वैद्यकीय तज्ज्ञांनी प्रयोगशाळेत चाचणीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी आणि चाचणी किंमत स्वस्त करण्यासाठी या नवीन तंत्राबद्दल अनेक सूचना दिल्या गेल्या आहेत.

वैज्ञानिकांनी जे नवीन तंत्र विकसित केले आहे त्याचे नाव पोलीमरेज चेन Reaction म्हणजेच पीसीआर आहे. या तंत्राद्वारे मशीन व्हायरल अनुवांशिक कण सतत कॉप करून त्याचे तपासणी करते जेणेकरून स्त्रोत सीओव्ही २ ची कोणती लक्षणे आहे ते कळू शकते. त्याचबरोबर आरएनएची चाचणी केली जाते ही सहसा जास्त वेळ घेते. यानंतर रुग्णाच्या नमुन्यातून इतर घटकांपासून आरएनए वेगळे केले जाते आणि मग त्यानंतर रुग्णांला कोरोना संसर्ग झाला आहे की नाही हे ठरवले जाते.

- Advertisement -

या तंत्रज्ञानाची संपूर्ण माहिती जीन्समध्ये प्रकाशित केली गेली आहे. पण या तंत्राद्वारे चाचणी करण्यासाठी वापरले जाणारे रसायनाचा जगात कमी पुरवठा आहे.


हेही वाचा – Corona Update: राज्यात २४ तासांत आढळले ७,९२४ नवे रुग्ण, २२७ जण मृत्यूमुखी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -