घरताज्या घडामोडीपंजाब सरकारनं मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीबाबत उत्तर द्यावं - स्मृती इराणी

पंजाब सरकारनं मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीबाबत उत्तर द्यावं – स्मृती इराणी

Subscribe

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (बुधवार) पंजाब दौऱ्यावर होते. यावेळी ते विविध विकासकामांचं उद्धाटन देखील करणार होते. मात्र, पंजाबमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक झाली. संतप्त शेतकऱ्यांकडून त्यांचा ताफा रोखण्यात आला होता. त्यामुळे पीएम मोदींनी आपला दौरा रद्द केला आणि ते पुन्हा दिल्लीसाठी रवाना झाले. दरम्यान, जी लोकं काँग्रेस पक्षामधून मोदींवर टीका करतात. ते आज देशाचे पंतप्रधान आणि त्यांच्या ताफ्यात त्रुटी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आपली बरोबरी भारत आणि भारताच्या पंतप्रधानांशी करू नका. पंजाब सरकारला आणि काँग्रेसला आता उत्तर द्यावं लागणार आहे, असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या.

काँग्रेस सरकारला उत्तर द्यावं लागेल

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या म्हणाल्या की, ज्या लोकांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी आणली. त्या लोकांना पीएम मोदींच्या गाडीजवळ आणि घटनास्थळी कोणी पोहोचवलं ? कारण भारतात प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की, पंतप्रधान यावेळी कुठे आहेत. काही लोकांना याबाबतची माहिती नसते. परंतु त्याक्षणी त्या लोकांना फ्लायओव्हर कोणी पाठवलं आणि व्यवस्था कशाप्रकारे करण्यात आली, याबाबत काँग्रेस सरकारला उत्तर द्यावं लागेल, असं देखील स्मृती इराणी म्हणाली.

- Advertisement -

काँग्रेस सरकार कोणत्या गोष्टीची वाट पाहत होतं?

इराणी पुढे म्हणाल्या की, या घटनेनंतर काँग्रेसच्या एका युवकाने जल्लोष करण्याचा प्रयत्न केला. का आणि कशासाठी हा जल्लोष साजरा करण्यात आला होता. मला आक्रोश या गोष्टीचा वाटतो की, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पंजाब सरकारकडून त्यावेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. काँग्रेस सरकार कोणत्या गोष्टीची वाट पाहत होतं. त्यामुळे पीएम मोदी घटनास्थळीवरून परतत असताना मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना एक संदेश दिला की, मैं जिंदा लौट रहा हूँ!, असं मोदी म्हणाले.

पंजाब सरकारनं मोदींची सुरक्षा धोक्यात टाकली

देशाच्या इतिहासात आतापर्यंत अशी घटना कधीच घडली नाही. पंजाब पोलिसांनी मोदींचा ताफा रस्तेमार्गे जाण्यासाठी ग्रीन सिग्नल कसा दिला. पंजाबच्या फिरोजपूरमधील सभा अर्धवट सोडून मोदी दिल्लीकडे रवाना झाले. लोकांच्या आशीवार्दामुळे मोदी भारताचे पंतप्रधान झाले आहेत. मोदींच्या ताफ्याबाबत जाणूनबुजून माहिती दिली गेली. पंजाब सरकारनं मोदींची सुरक्षा धोक्यात टाकली, असा आरोप देखील इराणी यांनी केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, मोदींची पंजाबमधील फिरोजपूरमध्ये मोठी रॅली होणार होती. परंतु आंदोलक शेतकऱ्यांनी भररस्त्यात मोदींचा ताफा रोखला. १५ ते २० मिनिटे उड्डाणपूलावर मोदींचा ताफा अडकला होता. मोदींच्या पंजाबच्या दौऱ्याची कल्पना असतानाही इतकी मोठी चूक झाल्यामुळे भाजपकडून आता मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तसेच याचे पडसाद संपूर्ण भारतात उमटत असून भाजप नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भटिंडा विमानतळावर पोहोचल्यानंतर मी विमानतळावर जिवंत पोहोचलो, याबाबत मुख्यमंत्र्यांचे आभार सांगा, अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली आहे.


हेही वाचा : Corona Positive: BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या मुलीला कोरोनाची लागण


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -