घरक्रीडाCorona Positive: BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या मुलीला कोरोनाची लागण

Corona Positive: BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या मुलीला कोरोनाची लागण

Subscribe

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या मुलगी सना गांगुलीला कोरोनाची लागण झाली आहे. सना गांगुलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परंतु त्यामध्ये कोरोनाची कमी लक्षणं आढळल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, सनाने स्वत:ला आयसोलेशन केलं आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु कोविड-१९ पॉझिटिव्ह चाचणीनंतर रूग्णालयातून घरी परतल्यानंतर काही दिवसांनी सना गांगुलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सौरव गांगुली यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना २७ डिसेंबरला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गांगुली यांना डेल्टा व्हेरियंट कोरोना झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गांगुलींच्या हृदयावर नुकतीच शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. परंतु दोन दिवसांपूर्वीच त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असताना त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, घरातील तीन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.

- Advertisement -

सौरव गांगुली यांचे काका आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार देवाशीश गांगुली, त्यांचा चुलत भाऊ सुवरदीप गांगुली आणि वहिनी जुईन गांगुली यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. २०२१ मध्ये गांगुलींना तीन वेळा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापूर्वी त्यांच्या छातीत अस्वस्थतेच्या तक्रारीनंतर दोन वेळा दाखल करण्यात आले होते. कोलकाता येथील घरी व्यायाम करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.

दरम्यान, सना गांगुली लंडनमध्ये शिक्षणासाठी असते. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ती कोलकातामध्ये आली आहे. तिने आपल्या शिक्षणाची सुरूवात कोलकाताच्या शाळेमधून केली होती. तसेच सना गांगुली तिच्या आईसारखी एक ट्रेंड डान्सर आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Guidelines for Home isolation : होम क्वारंटाईनबाबत केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स जारी; काय आहेत सूचना?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -